फेसबुकचा जनक मार्क झुकरबर्ग भारतात येणार

By Admin | Updated: October 16, 2015 17:35 IST2015-10-16T17:27:03+5:302015-10-16T17:35:12+5:30

सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचा जनक मार्क झुकरबर्ग भारतात येणार आहे. दिल्लीतील आयआयटीमध्ये

Facebook's father Mark Zuckerberg arrives in India | फेसबुकचा जनक मार्क झुकरबर्ग भारतात येणार

फेसबुकचा जनक मार्क झुकरबर्ग भारतात येणार

>ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि.१६ - सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचा जनक मार्क झुकरबर्ग भारतात येणार आहे. दिल्लीतील आयआयटीमध्ये २८ ऑक्टोबरला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मार्क झुकरबर्ग सहाभागी होणार असून यावेळी आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. 
याबाबत खुद्द मार्क झुकरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट टाकली आहे. यात त्याने भारतात १३० दशलक्ष पेक्षा जास्त लोक फेसबुकचा वापर करतात. आमच्यासाठी भारतातील सर्व यूजर्स फार महत्त्वाचे आहेत, असे म्हटले आहेत. तसेच, त्याने दिल्लीतील आयआयटीमध्ये २८ ऑक्टोबरला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असून यूजर्संना फेसबुक संदर्भातील कोणतेही प्रश्न विचारण्यास सांगितले आहे. 
 

Web Title: Facebook's father Mark Zuckerberg arrives in India