'फेसबुक किलर'मुळे दहशतीत वाढ

By Admin | Updated: February 5, 2017 13:07 IST2017-02-05T13:07:33+5:302017-02-05T13:07:33+5:30

भारतात दिवसेंदिवस सोशल मीडियाचा गैरवापर करण्याचे प्रकार समोर आले आहेत

'Facebook killer' leads to horrific increase | 'फेसबुक किलर'मुळे दहशतीत वाढ

'फेसबुक किलर'मुळे दहशतीत वाढ

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 5 - भारतात दिवसेंदिवस सोशल मीडियाचा गैरवापर करण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातच आता फेसबुक किलरमुळे सगळीकडेच दहशत पसरली आहे. स्वतःच्या घरच्यांपासून विभक्त राहणा-या जोडीदाराचा खून करून तो जिवंत असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना भासवायचं. जेणेकरून त्यांना संशय येणार नाही. तसेच त्यासाठी फेसबुक, ई-मेल, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करायचा, अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचं समोर आलं आहे. पश्चिम बंगालमधील एका प्रकरणामुळे फेसबुक किलर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील उदयन दास या व्यक्तीने सोबत राहणा-या आकांक्षा शर्मा हिची गेल्या वर्षी हत्या केली. त्यानंतर या विकृतानं तिचा मृतदेह गाडून आकांक्षा जिवंत असल्याचं तिच्या कुटुंबीयांना भासवत होता. आकांक्षाच्या कुटुंबीयांना तो दररोड व्हॉट्सअपवरून मॅसेज करत होता. मात्र त्याचा हा बनाव आता उघडकीस आला आहे.

या प्रकारामुळे शीना बोरा हत्याकांडाच्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या आहेत. शीना बोराची हत्या झाल्यानंतरही सोशल नेटवर्किंगवर ती जिवंत असल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र अशा प्रकारांवर आळा घालण्याची गरज असल्याचं मत मानसोपचारतज्ज्ञांनी मांडलं आहे.

Web Title: 'Facebook killer' leads to horrific increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.