शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:23 IST

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताबाबत प्रत्यदर्शींनी धक्कादायक अनुभव सांगितला.

Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. १२ जून रोजी झालेल्या या भीषण अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला. विमानातील प्रवासीच नव्हे तर ज्या निवासी भागात हे विमान पडलं तिथसे लोकही मृत्युमुखी पडले. विमानामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन असल्याने स्फोटाची तीव्रता जास्त होती आणि त्यामुळेच आजूबाजूचा परिसर बेचिराख झाला. आता आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींनी त्या घटनेबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर राहणाऱ्या रेखा यांनी विमान कोसळल्यानंतर भूकंप आल्यासारखे वाटलं असं म्हटलं.

अहमदाबादमध्ये झालेल्या एआय १७१ विमान अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी रेखा क्षत्रिय यांनी या भयानक दुर्घटनेनंतरच्या भयानक क्षणांची आठवण सांगितली. आम्हाला विमानाच्या मोठ्या आवाजाची सवय होती मात्र अपघाताच्या आवाजाने आमच्या कानाचे पडदे फुटतील असं वाटत होते, असे रेखा म्हणाल्या. रेखा यांनी यावेळी पायलटचेही आभार मानले. जर विमान थोडे आधीच कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती असं रेखा यांनी म्हटलं.

"ही घटना घडली तेव्हा आम्ही घरातच नेहमीची कामे करत होतो. त्यावेळी मोठा आवाज आला. विमानांचा आवाज ऐकायची आम्हाला सवय आहे. पण त्यावेळी कानाचे पडदे फाटतील असा आवाज येत होता. त्याच्यासोबत संपूर्ण घर देखील हादरत होतं. भूकंप आल्यासारखे वाटत होतं. त्यानंतर बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर आम्ही लगेच घरातून बाहेर पळत आलो आणि पाहिलं की विमान कोसळलं आहे. स्फोटानंतर उंचच उंच आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत होते. आग पसरु नये म्हणून सगळे गॅस बंद करुन बाहेर आले. पुढे जाऊन काही लोकांनी पाहिलं तेव्हा कळलं की हे प्रवासी विमान होतं. आम्हाला वाटत होतं की पाकिस्तानातून हल्ला झाला आहे," असं प्रत्यक्षदर्शी रेखा म्हणाल्या.

"आजूबाजूला भीतीचे वातावरण होतं. काही महिला तर विमान पाहून बेशुद्धच पडल्या. त्यांना वाटलं की विमान त्यांच्याच अंगावर पडेल. काहींनी तर ते पाहून रडायला सुरुवात केली. विमानाचे टायर आमच्या छताला स्पर्श करुन झाडाला कापत पुढे गेले. त्यामुळे सर्वजण घाबरले होते. मी पायलटचे आभार मानते, त्याने विमान थोडं पुढे उतरवलं. नाहीतर मृतांची संख्या आणखी वाढली असती," असेही रेखा म्हणाल्या. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडिया