पोलिसांवर ग्रेनेड फेकणारा अतिरेकी चकमकीत ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:08 IST2018-10-19T06:08:18+5:302018-10-19T06:08:21+5:30
श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्याच्या पट्टण भागात पोलीस पथकावर बुधवारी ग्रेनेड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश ...

पोलिसांवर ग्रेनेड फेकणारा अतिरेकी चकमकीत ठार
श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्याच्या पट्टण भागात पोलीस पथकावर बुधवारी ग्रेनेड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. तेहरिक-उल-मुजाहिद्दीन या संघटनेचा हा अतिरेकी होता, असे पोलिसांनी सांगितले.
शौकत अहमद भट असे या अतिरेक्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचे पथक बारामुल्लाच्या पट्टण भागातून जात असताना, या अतिरेक्याने त्यांच्यावर ग्रेनेड फेकला होता. ग्रेनेडचा स्फोट होऊ न त्यात पोलीस उपअधीक्षकासह तीन शिपाई जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्रेनेड फेकल्यानंतर तो अतिरेकी पुलवामा येथे पळून गेला, अशी माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्याचा साथीदार फेजान अहमद याला काल, बुधवारीच अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून शौकतची माहिती मिळाली होती. (वृत्तसंस्था)