अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त

By Admin | Updated: December 9, 2015 23:25 IST2015-12-09T23:25:30+5:302015-12-09T23:25:30+5:30

सुरक्षा दलाने बुधवारी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचे एक तळ उद्ध्वस्त करून पाच बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला.

Extremist Base Destroyed | अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त

अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त

भद्रवाह (डोडा) : सुरक्षा दलाने बुधवारी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचे एक तळ उद्ध्वस्त करून पाच बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला.
लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार लष्कर, एसएसबी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने डोडा जिल्ह्णाच्या किंद्रे-सुईगड जंगलात राबविलेल्या शोध मोहिमेदरम्यान एका नैसर्गिक गुफेत हे तळ आढळून आले. या ठिकाणावरून एके ५६ रायफल, चिनी पिस्तूल, एक .३०३ रायफल, एक यूबीजीएल, दोन गावठी बॉम्ब, ११ एके मॅगझिन, तीन रेडिओ संचासह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केली. या तळाबद्दल सुरक्षा दलाला गोपनीय सूचना मिळाली होती.

Web Title: Extremist Base Destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.