वाढत्या महागाईवर रानभाज्यांचा उतारा
By Admin | Updated: July 19, 2016 00:18 IST2016-07-19T00:10:59+5:302016-07-19T00:18:43+5:30
आदिवासी बाजारपेठेत विशेष मागणी

वाढत्या महागाईवर रानभाज्यांचा उतारा
पेठ : एकीकडे शहरी भागात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या अडत प्रश्नावरून बाजार समित्यांनी पुकारलेल्या बंदमुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले असताना गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले असताना पेठच्या आदिवासी भागात याची फारशी झळ बसलेली दिसून आलेली नाही. याचे कारण म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने सध्या या भागात रानभाज्या सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत.
पहिल्या पावसाबरोबर येणाऱ्या कवळीच्या भाजीने खरे तर रानभाज्यांची सुरुवात होत असते. अवघ्या आठवडाभर टिकणारी ही भाजी प्राप्त करून घेण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. भल्या पहाटे नागरिक जंगलात जाऊन भाज्या आणून पेठ, करंजाळी, कोहोर, जोगमोडी, आंबे आदि मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. रासायनिक खते व बियाणांनी पिकवलेल्या भाज्यांकडे पावसाळा भर आदिवासी भागात पाठ फिरवली
जाते. कोणत्याही प्रकारचा रासायनिक टच नसलेल्या नैसर्गिकरीत्या
तयार होणाऱ्या या भाज्यांना सद्या बाजारात चांगलीच मागणी आहे. (वार्ताहर)