मालमत्तेचे विवरण देण्यास चार महिन्यांचा अतिरिक्त कालावधी सरकारी कर्मचाऱ्यांना लोकपाल विधेयकानुसार मिळाली मुदतवाढ

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:04+5:302014-12-25T22:41:04+5:30

नवी दिल्ली-आपल्या मालमत्तेचे विवरण देण्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लोकपाल विधेयकानुसार चार महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळाला आहे. जुन्या तरतुदीनुसार ही माहिती या महिन्याच्या अखेरपर्यंत सादर करावयाची होती. ती आता ३० एप्रिल २०१५ पर्यंत सादर करता येणार आहे.

Extra duration of four months extension of property details Government employees get extension as per Lokpal Bill | मालमत्तेचे विवरण देण्यास चार महिन्यांचा अतिरिक्त कालावधी सरकारी कर्मचाऱ्यांना लोकपाल विधेयकानुसार मिळाली मुदतवाढ

मालमत्तेचे विवरण देण्यास चार महिन्यांचा अतिरिक्त कालावधी सरकारी कर्मचाऱ्यांना लोकपाल विधेयकानुसार मिळाली मुदतवाढ

ी दिल्ली-आपल्या मालमत्तेचे विवरण देण्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लोकपाल विधेयकानुसार चार महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळाला आहे. जुन्या तरतुदीनुसार ही माहिती या महिन्याच्या अखेरपर्यंत सादर करावयाची होती. ती आता ३० एप्रिल २०१५ पर्यंत सादर करता येणार आहे.
अशा प्रकारची माहिती देण्याच्या अर्जातही सरकार दुरुस्ती करीत आहे. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने मालमत्ता व देयकांची माहिती देण्याची कालमर्यादा चार महिन्यांनी वाढवून ती ३० एप्रिल २०१५ केली आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या संपत्तीचे विवरण देण्यासंदर्भात काही सनदी अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
डीओपीटीने या मुद्यांवर विचार करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. समितीने आपला पहिला अहवाल सादर करताना, या प्रक्रियेला सरळ व सोपे बनवावे, असे म्हटले होते.

Web Title: Extra duration of four months extension of property details Government employees get extension as per Lokpal Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.