राज ठाकरेंविरोधी वॉरंटच्या स्थगितीला मुदतवाढ
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:27+5:302015-02-13T00:38:27+5:30
नवी दिल्ली : बिहारी समुदायाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध काढण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटला दिल्ली उच्च न्यायालयाने २१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ३० जानेवारी २०१३ रोजी न्यायालयाने वॉरंटला स्थगिती दिली होती.

राज ठाकरेंविरोधी वॉरंटच्या स्थगितीला मुदतवाढ
न ी दिल्ली : बिहारी समुदायाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध काढण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटला दिल्ली उच्च न्यायालयाने २१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ३० जानेवारी २०१३ रोजी न्यायालयाने वॉरंटला स्थगिती दिली होती.२००८ मध्ये राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. आठ जणांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल करीत मनसेप्रमुखांना उत्तर मागितले होते. न्यायालयाने या सर्व याचिकाकर्त्यांना नोटीस जारी केली आहे. खटला रद्द करण्यासाठी राज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सर्व प्रकरणांची सुनावणी २१ मे रोजी करण्याचा आदेश न्या. सुनील गौर यांनी दिला.