शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; ईपीएफओचा निर्णय, ३ मेपर्यंत करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 05:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेनुसार वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढविण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेनुसार वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. आधी ही मुदत ३ मार्च २०२३ पर्यंत होती, आता ती वाढवून ३ मे २०२३ करण्यात आली आहे. 

वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्यास कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) या निर्णयाची घोषणा केली आहे. ईपीएफओच्या एकीकृत सदस्य पोर्टलवर अलीकडेच सक्रिय करण्यात आलेल्या यूआरएलमध्ये वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ मे असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. वाढीव निवृत्ती वेतनासाठी कर्मचारी आणि त्याची कंपनी अशा दोघांना संयुक्तरीत्या अर्ज करावा लागणार आहे. 

सरकारने मुदतवाढ दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे. पेन्शन याेजनेसाठी १५ हजार रुपये मूळ वेतन गृहित धरूनच याेगदान निश्चित हाेत हाेते. मूळ वेतन ५० हजार झाले तरीही याेगदान १५ हजार रुपयांवरच जमा केले जाते. मात्र, आता ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आदेश ४ नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वाढीव पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांची मुदत देण्याचे आदेश दिले होते. ही मुदत ३ मार्च २०२३ ला संपणार होती. गेल्या आठवड्यात ईपीएफओने वाढीव पेन्शनसंबंधीचा तपशील जारी केला होता. काय आहे योजना?n नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेंशन (संशोधन) योजना,  २०१४ कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. n त्याआधी २२ ऑगस्ट २०१४ मध्ये ईपीएसमध्ये सुधारणा करून त्यासाठीची वेतन मर्यादा ६,५०० रुपयांवरून वाढवून १५ हजार रुपये केली होती. ईपीएससाठी वेतनातील कंपनीची कपात ८.३३ टक्के करण्यासही मान्यता देण्यात आली होती.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी