एक्स्प्रेस घसरली; ३८ ठार

By Admin | Updated: March 21, 2015 02:18 IST2015-03-21T02:18:16+5:302015-03-21T02:18:16+5:30

वाराणशी जिल्ह्यातील बछरावा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी डेहराडून - वाराणशी जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरल्याने ३८ प्रवासी ठार तर सुमारे १५० जखमी झाले.

Express slipped; 38 killed | एक्स्प्रेस घसरली; ३८ ठार

एक्स्प्रेस घसरली; ३८ ठार

रायबरेली : वाराणशी जिल्ह्यातील बछरावा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी डेहराडून - वाराणशी जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरल्याने ३८ प्रवासी ठार तर सुमारे १५० जखमी झाले. चालकाने सिग्नल तोडल्याने इंजिन आणि लगतचे दोन डबे रुळावरून घसरले, असे रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी दिल्लीत सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. रायबरेलीनजीक झालेल्या या अपघाताविषयी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Web Title: Express slipped; 38 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.