शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हवाईतळावर डागली दोन ड्रोनमधून स्फोटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 06:10 IST

जम्मूतील घटनेत दोन जवान जखमी

ठळक मुद्देजम्मूतील भारतीय वायुदलाच्या तळावरील हा दहशतवादी हल्लाच आहे, असे जम्मू-काश्मीर पोलीसप्रमुख दिलबाग सिंह यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) दहशतवादी तपास पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे

जम्मू : येथील विमानतळावरील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावर दोन ड्रोनमधून स्फोटके टाकण्यात आली. शनिवारी रात्री १.४० वाजता सहा मिनिटाच्या आत दोन स्फोट झाले. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहिल्यांदाच मानवरहित ड्रोनचा वापर केला, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यात भारतीय वायुदलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. पहिला स्फोट शहरालगच्या सतवारी भागातील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावरील अत्यंत सुरक्षित एक मजली इमारतीत तर  दुसरा खुल्या जागेत झाला.

जम्मूतील भारतीय वायुदलाच्या तळावरील हा दहशतवादी हल्लाच आहे, असे जम्मू-काश्मीर पोलीसप्रमुख दिलबाग सिंह यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) दहशतवादी तपास पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे, असे दिलबाग सिंह यांनी सांगितले. या ड्रोनने कोठून उड्डाण केले आणि त्यांचा मार्ग कसा होता, याचाही तपास केला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू विमानतळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून जम्मू विमानतळाचे हवाई अंतर १४ किलो मीटर आहे. या घटनेप्रकरणी बेकायदेशीर कारवया प्रतिबंधक कायद्यान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एनआयएकडे तपास  दिला

पठाणकोट जिल्ह्यात सतर्कताn जम्मू विमानतळावर झालेल्या दोन स्फोटांच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या सीमावर्ती पठाणकोट जिल्ह्यात सर्तकतेचा आदेश जारी करण्यात आला आहे. n सर्व संवेदनशील भागात आणि पठाणकोट सभोवतालच्या परिसरात गस्त वाढविण्यात आली असून अतिरिक्त दले तैनात करण्यात आली आहेत, असे पठाणकोटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लाम्बा यांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी पठाणकोटस्थित हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता.

दुसरा मोठा हल्ला टाळलाn ड्रोन हल्ल्याचा अधिकारी तपास करीत असताना सहा किलो स्फोटकांसह एका व्यक्तीला जेरबंद करुन दुसरा मोठा हल्ला टाळण्यात आला. अटक करण्यात आलेली व्यक्तील लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असावी, असे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले. या संशयित व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला