भावनगर(गुजरात)/ कानपूर(उ. प्र.) : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील अलंग येथे जहाज भंगारात काढण्याच्या कारखान्यात शनिवारी वायुगळतीनंतर झालेल्या स्फोटात पाच ठार, तर सात जण जखमी झाल़े उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातही एका सुलभ शौचालयात ठेवलेल्या सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर लागलेल्या आगीत सहा जण मृत्युमुखी पडले, तर 19 जण जखमी झाल़े
गुजरातेत अलंग येथील जहाज भंगारात काढण्याच्या कारखान्यात एका जहाजात अचानक स्फोट झाला़ येथील प्लॉट नंबर 14क् मध्ये जहाज मोडीत काढत असताना त्यात झालेल्या वायुगळतीमुळे स्फोट झाल्याचे कळत़े
अर्थात अद्यापही स्फोटाचे नेमके कारण कळू शकलेले नाही़ या दुर्घटनेत पाच लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य सात गंभीर जखमी झाल़े
कानपुरात एका सुलभ शौचालयात ठेवलेल्या गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाली आणि त्यानंतर आग लागली़; यात सहा ठार तर 19 जण जखमी झाल़े यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आह़े मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आह़े
चमनगंज येथील अनिल याच्या घरात गॅस सिलिंडर संपला होता़ त्याच्या पत्नीने त्याला भरलेला सिलिंडर लावण्यास सांगितल़े तो सिलिंडर लावत असतानाच अचानक त्यातून गॅस गळती सुरू झाली़ ती रोखण्याच्या प्रयत्नात सिलिंडरची पिन तुटून पडली़
यामुळे त्याने तो उचलून जवळच्या सुलभ शौचालयातील पाण्याच्या टाक्यात टाकून दिला़ याचदरम्यान शौचालयात गेलेल्या एका व्यक्तीने बिडी पेटवली आणि क्षणात शौचालयासह आजूबाजूच्या भागात आग पसरली़ ही आग इतकी भीषण होती की,अनेकांना पळणोही मुश्कील झाल़े
(वृत्तसंस्था)
4उत्तर दिल्लीच्या इंद्रलोक या गजबलेल्या भागात आज शनिवारी सुमारे 5क् वर्षे जुनी चार मजली इमारत कोसळून दहा ठार तर दोन जखमी झाल़े मृतांमध्ये पाच बालके व तीन महिलांचा समावेश आह़े
4घटनास्थळी युद्धस्तरावर मदतकार्य सुरू असून ढिगारे हटविण्याचे काम सुरू आह़े याप्रकरणी एक सहायक अभियंता आणि एका कनिष्ठ अभियंत्यास निलंबित करण्यात आले असून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आह़े
4या इमारतीच्या बाजूच्या जागेवर बांधकाम सुरू होत़े यामुळेच ही इमारत कोसळण्याचा कयास व्यक्त केला जात आह़े शेजारच्या प्लॉटवरील बांधकाम रोखण्यासाठी आधीच नोटीस जारी करण्यात आली होती.
मात्र याउपरही इथे खोदकाम सुरू होत़े
4गुवाहाटी : आसामची राजधानी गुवाहाटी येथे मुसळधार पाऊस थांबला असला तरी पूरबळींची संख्या शनिवारी 11 वर पोहोचली़ विजेचा धक्का लागून मुश्ताक खान नामक एकाचा मृत्यू झाला तर राजधानीच्या भेटापत्र भागातील नाल्यात एक युवकाचा मृतदेह आढळून आला़ अनिल नगर भागातील भारालू नदीत बुडालेल्या एका युवकाचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला़ याचबरोबर पूरबळींची संख्या 11 वर पोहोचली़ काल शुक्रवारी विजेचा धक्का लागल्याने व भूस्खलनामुळे किमान आठ लोकांचा मृत्यू झाला होता़