ऑनलाइन टीम
गांधीनगर, दि. २८ - गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील अलंग येथे जहाजे भंगारात काढण्यात येणा-या कारखान्यात वायुगळती होऊन झालेल्या स्फोटात ५ मजूर ठार झाले आहेत तर दहा जण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. केंद्रातील प्लॉट क्रमांक १४० मध्ये काम सुरू असताना अचानक वायुगळती सुरू झाल्याने स्फोट झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. या दुर्घटनेत ५ जणांना जीव गमवावा लागला तर १० जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.