ग्रंथराज ज्ञानदेवाचे अलौकिकत्व अनुभवा - पुरुषोत्तम महाराज आकोटात गुरुमाऊली जयंती पर्वाचा भक्तिमय प्रारंभ
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:14+5:302015-02-14T23:52:14+5:30
आकोट : ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अमृततत्त्वाला परमत्वाचा स्पर्श होता. माऊलींच्या व्यक्तित्वात संत्व, कवित्व आणि विश्वत्व यांचा त्रिवेणी संगम आहे. या ग्रंथराज ज्ञानेश्वरी अलौकिकत्व अनुभवा आणि धन्य व्हा, असे प्रतिपादन धर्मशास्त्राचे अभ्यासक हभप पुरुषोत्तम महाराज बावस्कर यांनी श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे संत वासुदेव महाराज जयंती महोत्सव १४ फेब्रुवारीला प्रारंभी केले.

ग्रंथराज ज्ञानदेवाचे अलौकिकत्व अनुभवा - पुरुषोत्तम महाराज आकोटात गुरुमाऊली जयंती पर्वाचा भक्तिमय प्रारंभ
आ ोट : ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अमृततत्त्वाला परमत्वाचा स्पर्श होता. माऊलींच्या व्यक्तित्वात संत्व, कवित्व आणि विश्वत्व यांचा त्रिवेणी संगम आहे. या ग्रंथराज ज्ञानेश्वरी अलौकिकत्व अनुभवा आणि धन्य व्हा, असे प्रतिपादन धर्मशास्त्राचे अभ्यासक हभप पुरुषोत्तम महाराज बावस्कर यांनी श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे संत वासुदेव महाराज जयंती महोत्सव १४ फेब्रुवारीला प्रारंभी केले.दरम्यान, सप्ताहातील विविध कार्यक्रमांचा प्रारंभ तीर्थस्थापनेने झाला. संस्थेचे विश्वस्त दादाराव पुंडेकर यांचे हस्ते सपत्नीक तीर्थस्थापना व पूजन पार पडले. पहाटे दिनकर तराळे एदलापूर यांनी गुरुमाऊलींचा अभिषेक केला. संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव हिंगणकर व उपाध्यक्ष गंगाधर गोहाड यांनी गुरूपूजन करून वारकरी ध्वजवंदन केले. याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर, सचिव रवींद्र वानखडे, विश्वस्त त्र्यंबकराव काळमेघ, सदाशिवराव पोटे, महादेवराव ठाकरे, दिलीप हरणे, अनिल कोरपे, अशोकराव पाचडे, प्रा. साहेबराव मंगळे, प्रभाकरराव ढगेकर, अंबादास होनाडे, मधुकरराव तराळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वरी पारायणाला गावोगावचे भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारायणपीठाचे नेतृत्व अंबादास महाराज व वासुदेव महाराज अस्वार यांनी केले. दुपारचे प्रवचनसत्रात हभप जगदीश महाराज वाघागड यांनी संत वासुदेव महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून या संतत्वाला अभिवादन केले. त्यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांनी केले. रात्री कीर्तनमालेचे प्रथम पुष्प हभप प्रभाकर महाराज गंगाखेडकर यांनी गुंफले. कीर्तनाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)फोटो क्र.१४ एकेटीपी०७ *** इन्फोबॉक्स ....आजचे कार्यक्रमसकाळी ८ वाजता : श्री ज्ञानेश्वरी पारायणदुपारी ३ वाजता : इंजि. बाळकृष्ण आमले यांचे प्रवचनरात्री ८ वाजता : हभप पुरुषोत्तम महाराज बावस्कार यांचे कीर्तन