बहिणाबाई स्मारकाला वाढीव निधीची गरज वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा : जिल्हा नियोजन समितीतून मिळाले एक कोटी
By Admin | Updated: January 2, 2016 08:33 IST2016-01-02T08:33:18+5:302016-01-02T08:33:18+5:30
जळगाव : खान्देश कन्या व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी वाढीव निधीची प्रतिक्षा आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत एक कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाल्याने स्मारकाच्या कामाला नवीन वर्षात गती येणार आहे.

बहिणाबाई स्मारकाला वाढीव निधीची गरज वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा : जिल्हा नियोजन समितीतून मिळाले एक कोटी
ज गाव : खान्देश कन्या व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी वाढीव निधीची प्रतिक्षा आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत एक कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाल्याने स्मारकाच्या कामाला नवीन वर्षात गती येणार आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे आसोदा येथे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी नागरिकांनी तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार स्मारकाच्या कामासाठी ७.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने २५ टक्के काम पूर्ण झाले होते. दरम्यानच्या काळात स्मारकाचे काम तांत्रिक कारणांमुळे रखडल्याने या कामाची रक्कम वाढली. वाढीव रकमेसाठी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक झाली. त्यावेळी प्रस्ताव तयार करून सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबत निर्णय घेण्यात आला.बुधवार ३० रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बहिणाबाई स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षात स्मारकाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.