राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 20 तारखेनंतर होणार
By Admin | Updated: November 14, 2014 01:56 IST2014-11-14T01:56:54+5:302014-11-14T01:56:54+5:30
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार 2क् तारखेनंतर करण्याचे ठरले असून, नाराजांसह अपक्षांना स्थान देण्याचा प्रयत्न करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 20 तारखेनंतर होणार
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार 2क् तारखेनंतर करण्याचे ठरले असून, नाराजांसह अपक्षांना स्थान देण्याचा प्रयत्न करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विश्वासमत जिंकताना विधानसभेत व आवारात झालेल्या घटनांचे भाजापाध्यक्ष अमित शहा यांना ‘रिपोर्टिग’ करायला ते राजधानीत आले असताना त्यांनी हे सुतोवाच केले.
महाराष्ट्रातील राजकीय तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सायंकाळी राजधानी गाठली. शिवसेनेने विरोधी पक्षनेता जाहीर केल्याने आता त्यांच्याशी चर्चा थांबली असल्याचे स्पष्ट करून रामदास आठवले यांची समजूत काढण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, मतविभाजन कोणीच मागितले नव्हते. स्वत:ची चूक झाकण्यासाठी जे त्याविरुद्ध ओरड करीत आहेत, त्यांनी पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणावा. अडविले कोणी, असे आव्हान देत अविश्वास प्रस्ताव पुन्हा आणल्यास 15क्हून अधिक सदस्य सरकारच्या बाजूचे आहेत, ते दाखवून देईन. 1981 पासून कालर्पयत जेव्हा अविश्वास प्रस्ताव आले, त्यातील दोन वगळता सर्वच आवाजी मतदानाने पारित झाले. यावेळी जेव्हा प्रस्तावाची प्रक्रिया सुरू होती, त्यावेळी निम्मी शिवसेना आत व निम्मी बाहेर का होती, याचा शोध घ्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीशी युती करणार का, यावर ते म्हणाले, विश्वास प्रस्तावाशीही राष्ट्रवादीचा संबंध नव्हता, तेव्हा युतीचा प्रश्न येत नाही. राज्यपालांना धक्काबुक्की करणा:यांना क्षमा नाही. 15 आमदारांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्याचे फुटेज आमच्याकडे आहे. चार आमदारांना निलंबित केले आहे, इतरांवर अहवालानंतर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
कापूस खरेदी लवकर
नाफेड कापूस खरेदी केंद्र राज्यात लवकरच सुरू होतील. तसे आदेश अरूण जेटली यांनी काढल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तर राज्याने व्ॉट कमी केल्यास दाभोळ वीज प्रकल्पासाठी स्वस्त दरात गॅस उपलब्ध देण्यासाठी पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान राजी असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या घडमोडीसाठी चर्चा : राष्ट्रवादीसोबत जमविलेल्या सुताने भाजपाच्या प्रतिमेच्या ठिक:या उडाल्यामुळे विस्ताराआधी पुढची रणनीती ठरविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे अमित शहा यांचे खास व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना सोबत घेऊन शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. शपथविधीपूर्वी राज्याच्या घडामोडींबाबतची बोलणी पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान व चंद्रकात पाटील यांच्याशीच करण्याच्या सूचना शहा यांनी याआधी दिल्या होत्या. यावेळी पुन्हा तीच सूचना शहा यांनी केली होती. दोघांनी प्रथम प्रधान यांची भेट घेऊन, रात्री दोघेही शहा यांच्या भेटीसाठी गेले.