शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Exit Polls: चार राज्यांत निष्कर्ष खरे : गोव्यात विजय मिळवून भाजपचा जनमत चाचण्यांना चकवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 06:15 IST

उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, पंजाबबाबतचे निष्कर्ष खरे ठरले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्येच भाजपची सत्ता येईल, अशी शक्यता बहुतांश जनमत चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आली होती. मात्र, भाजपने गोव्यातही बहुमत मिळवून या  निष्कर्षांना चकवा दिला. पंजाबमध्ये आपची सत्ता येईल, हा जनमत चाचण्यांचा अंदाज खरा ठरला आहे.

इंडिया टुडे - ॲक्सिस, माय इंडिया, सीएनएन-न्यूज १८, टाईम्स नाऊ-व्हेटो, इंडिया न्यूज आदींनी केलेल्या जनमत चाचण्यांत उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळून तो पक्ष सत्तेवर येईल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. तसेच पी-मार्क, सी-व्होटर आदी संस्थांनी केलेल्या जनमत चाचण्यांत मणिपूरमध्ये भाजपच सत्तेवर येईल, असे सूतोवाच केले होते, तेही खरे ठरले. मात्र, गोव्यात भाजपला १४ ते १८ इतक्याच जागा मिळतील, हे जनमत चाचण्यांनी केलेले भाकीत मात्र चुकीचे ठरले. गोव्यात भाजपने २० जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला ७१ ते १६० जागा मिळतील, असे जनमत चाचण्यांनी म्हटले होते. समाजवादी पक्षाने १२०च्या वर जागा जिंकून हा निष्कर्ष बऱ्याच अंशी खरा ठरवला आहे. पंजाबमध्ये आप पक्षाला ७६ ते ९० इतक्या जागा मिळतील, असा जनमत चाचण्यांचा होरा होता. 

जनमत चाचण्यांचे अंदाज चुकूही शकतातपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातील जनमत चाचण्यांचे निष्कर्ष खरे ठरले. याचा अर्थ प्रत्येक वेळेसच तसे होईल, असे समजण्याचे कारण नाही. अनेकदा जनमत चाचण्यांचे निष्कर्ष फसले असल्याच्या वस्तुस्थितीकडे राजकीय निरीक्षकांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२