शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Exit Poll: भाजपाला बहुमताची हुलकावणी; हरयाणा विधानसभेत 'जेजेपी' ठरणार 'किंगमेकर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 19:50 IST

भाजपा, काँग्रेसमध्ये सत्तेसाठी जोरदार चुरस

चंदिगढ: महाराष्ट्रासोबत हरयाणातही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. महाराष्ट्रात महायुतीला मोठा जनादेश मिळताना दिसत असला तरी हरयाणात भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियानं केलेल्या सर्वेक्षणातून भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी लढत दिसत आहे. त्यामुळे हरयाणात सत्ता स्थापनेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळू शकते. हरयाणात विधानसभेचे 90 मतदारसंघ आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी 46 जागांची आवश्यकता असते. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपाला 32 ते 44, तर काँग्रेसला 30 ते 42 जागा मिळू शकतात. काल मतदान झाल्यानंतर जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी भाजपाला प्रचंड बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला हरयाणात केवळ 15 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला 47 जागांवर यश मिळालं होतं.हरयाणात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतो. राज्यात काँग्रेस, भाजपामध्ये सत्तेसाठी जोरदार चुरस असताना दुश्यंत चौटाला यांच्या जेजेपीला 6 ते 10 मिळू शकतात. इतर पक्षांनादेखील 6 ते 10 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाचा अंदाज खरा ठरल्यास 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाल्यावर हरयाणात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळू शकतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 47 जागा मिळाल्या होत्या. यानंतर 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं राज्यातील सर्वच्या सर्व 10 जागा जिंकल्या. यावेळी राज्यातील 79 विधानसभा मतदारसंघात भाजपानं आघाडी मिळवली. मात्र आता हे चित्र बदलताना दिसत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 15 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 10 विधानसभा मतदारसंघात आघाडी राखता आली.  

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस