शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Exit Poll :  गुजरातमध्ये पुन्हा फुलणार कमळ, राहुल गांधींचे प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 21:37 IST

होम ग्राऊंड टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारामध्ये संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मोदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी राहुल गांधी झंझावाती प्रचार केला.

अहमदाबाद - होम ग्राऊंड टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारामध्ये संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मोदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी राहुल गांधी झंझावाती प्रचार केला. याच पार्श्वभूमीवर आता सर्वेक्षणांचे आकडे समोर आले आहेत. इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून भाजपला गुजरातमध्ये 99-113 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला 68-82 जागा मिळतील असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आलं आहे.  2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 116 आणि काँग्रेसला 60 जागा जिंकण्यात यश आले होते. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकूर व दलित नेता जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केले. राहुल गांधी यांच्या प्रचारसभांनाही अनपेक्षित प्रतिसाद मिळाला होता. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड लागल्यावर ही पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेसनेही कंबर कसली. यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये 30 पेक्षा जास्त प्रचारसभा घ्याव्या लागल्या.

कोणाला किती जागा मिळणार?

  • भाजप – 99-113
  • काँग्रेस –  68-82
  • इतर - 1-4

कोणाला किती टक्के मतदान 

  • भाजपा - 47
  • काँग्रेस - 42
  • अन्य- 11

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात 89 जागांवर विक्रमी मतदान झाले होते. जवळपास 67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होत असून यात अहमदाबाद, बडोदा यासारख्या शहरांचा समावेश आहे. 2012 च्या निवडणुकीत 93 पैकी 52 जागांवर भाजपचा विजय झाला होता. तर काँग्रेसला ३९ जागांवरच समाधान मानावे लागले होते. गेल्या निवडणुकीत अहमदाबाद, बडोदा या शहरांमधील 23 पैकी 20 जागांवर भाजपचे आमदार निवडून आले होते. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील बालेकिल्ला टिकवणे भाजपला जड जाणार नाही, असे दिसते. दुसरीकडे अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भवितव्यही आज मतपेटीत बंद होणार आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि काँग्रेसचे जिवाभाई पटेल यांच्यात मेहसाणात अटीतटीची लढत आहे.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी