आधार नसलेल्यांनाही सवलती
By Admin | Updated: March 9, 2017 00:28 IST2017-03-09T00:28:13+5:302017-03-09T00:28:13+5:30
आधार क्रमांक नसलेल्या नागरिकांनाही सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, कोणालाही लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, असा खुलासा केंद्र सरकारने केला आहे.

आधार नसलेल्यांनाही सवलती
नवी दिल्ली : आधार क्रमांक नसलेल्या नागरिकांनाही सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, कोणालाही लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, असा खुलासा केंद्र सरकारने केला आहे.
सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, आधारशिवाय कोणालाही सवलतींपासून वंचित ठेवले जाणार नाही. जोपर्यंत आधार मिळणार नाही, तोपर्यंत ओळख पटविण्याच्या अन्य साधनांच्या माध्यमातून सवलती सुरू ठेवल्या जातील. या निवेदनातंर प्रकरणातील गुंतागुंत वाढणार आहे. आधार आवश्यकच आहे, तथापि, जोपर्यंत ते मिळत नाही, तोपर्यंत अन्य माध्यमांतून लाभार्थींची ओळख पटविली जाईल, असा या निवेदनाचा अर्थ असल्याचे जाणकारांनी सांगितले. गरीब महिलांना पंतप्रधान उज्ज्वला योजने अंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसची (एलपीजी) मोफत जोडणी मिळविण्यासाठी आता आधार क्रमांक आवश्यक करण्यात आला आहे.