पंतप्रधान सडक योजनेचे कार्यकारी अभियंता निलंबन

By Admin | Updated: September 3, 2015 23:52 IST2015-09-03T23:52:50+5:302015-09-03T23:52:50+5:30

नंदुरबार : पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एस.एस. सांगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. सांगळे यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक ठिकाणाहून तक्रारी होत्या.

Executive Engineer Suspension of Prime Minister's Plan | पंतप्रधान सडक योजनेचे कार्यकारी अभियंता निलंबन

पंतप्रधान सडक योजनेचे कार्यकारी अभियंता निलंबन

दुरबार : पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एस.एस. सांगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. सांगळे यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक ठिकाणाहून तक्रारी होत्या.
धुळे येथे कार्यरत असताना त्यांनी जुन्याच रस्त्यांचे नवीन बांधकाम करावयाचे दाखवून मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची मंजुरी मिळविली होती. त्या रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू असतानाच तक्रारी झाल्याने अनेक कामे रद्द करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून निलंबित केले आहे.

Web Title: Executive Engineer Suspension of Prime Minister's Plan