शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मद्य तयार करणार्‍या कारखान्यावर छापा एक्साईजची कारवाई : दारू बनविण्याचे साहित्य जप्त; दोघे ताब्यात

By admin | Updated: August 1, 2015 00:19 IST

सोलापूर : भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत देशी-विदेशी दारू कंपन्यांची हुबेहूब नक्कल करून बनावट दारू तयार करणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी रात्री सात ते साडेसातदरम्यान अचानक धाड टाकून कारवाई केली. भरलेल्या आणि रिकाम्या दारूच्या बाटल्या, झाकण, लेबल आणि दारू तयार करण्याचेे साहित्य जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.

सोलापूर : भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत देशी-विदेशी दारू कंपन्यांची हुबेहूब नक्कल करून बनावट दारू तयार करणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी रात्री सात ते साडेसातदरम्यान अचानक धाड टाकून कारवाई केली. भरलेल्या आणि रिकाम्या दारूच्या बाटल्या, झाकण, लेबल आणि दारू तयार करण्याचेे साहित्य जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.
इम्तियाज इस्माईल शेख (वय-३५) आणि इस्माईल नसरोद्दीन शेख (दोघे रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तीन महिन्यांपासून या कारखान्यात देशी-विदेशी बनावट मद्य तयार होत असल्याची कुणकुण एक्साईचे दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड यांना लागली. त्यानुसार त्यांनी एक्साईजच्या विविध पथकांच्या मदतीने शुक्रवारी रात्री कारखान्यावर अचानक छापा घातला असता तेथील गैरप्रकार उजेडात आला.
आयबी (इंपिरियल ब्लू), रॉयल स्टॅग, मॅकडॉल नंबर वन आणि देशी गणलेली टँगो पंच दारूच्या रिकाम्या आणि भरलेल्या बाटल्या, झाकण, लेबल, स्पिरिट, तयार ब्लेंड, दारू तयार करण्यासाठी लागणारी मशीन आणि इतर साहित्य असा १ लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त केला. अधीक्षक सागर धोमकर, उपअधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र पाटील, दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड, प्रशांत निकाळजे, महिबूब शेख, मनीषा मिसाळ, राहुल बांगर, एस. बी. साळुंखे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, कॉन्स्टेबल मयूर भोसेकर, रेवणसिद्ध कांबळे, गणेश सुळे, अलीम शेख, चेतन व्हनगुंटी, योगीराज तोग्गी, राजेंद्र ठाकूर, महिला कॉन्स्टेबल शाहीन शेख, भाग्यश्री शेरखाने, प्रियंका कुटे, वाहनचालक संजय नवले, निशांत मिसाळ या जॅम्बो पथकाने ही धाडसी कारवाई केली. तपास दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड करीत आहेत. (प्रतिनिधी)
इन्फो बॉक्स
बनावट दारू कुठे जात होती?
तीन महिन्यांपासून चालत असलेल्या या कारखान्यातून तयार होणारी दारू शहर आणि परिसरात कुठे विकली जात होती. शहरातील कुठल्या परमिट रुम, बीअर बारमध्ये, शहराबाहेरील ढाब्यांवर बनावट दारू कंपनी रेटमध्ये विकली जायची का? या सर्व प्रश्नांचे उत्तर आता तपास करताना शोधावे लागणार असल्याचे तपास अधिकारी तथा दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड यांनी सांगितले.
जोड आहे....