बनावट मद्य तयार करणार्‍या कारखान्यावर छापा एक्साईजची कारवाई : दारू बनविण्याचे साहित्य जप्त; दोघे ताब्यात

By Admin | Updated: August 1, 2015 00:19 IST2015-08-01T00:19:01+5:302015-08-01T00:19:01+5:30

सोलापूर : भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत देशी-विदेशी दारू कंपन्यांची हुबेहूब नक्कल करून बनावट दारू तयार करणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी रात्री सात ते साडेसातदरम्यान अचानक धाड टाकून कारवाई केली. भरलेल्या आणि रिकाम्या दारूच्या बाटल्या, झाकण, लेबल आणि दारू तयार करण्याचेे साहित्य जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.

Execution proceedings on fake liquor manufacturing plant: seized liquor products; Both of them are in control | बनावट मद्य तयार करणार्‍या कारखान्यावर छापा एक्साईजची कारवाई : दारू बनविण्याचे साहित्य जप्त; दोघे ताब्यात

बनावट मद्य तयार करणार्‍या कारखान्यावर छापा एक्साईजची कारवाई : दारू बनविण्याचे साहित्य जप्त; दोघे ताब्यात

लापूर : भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत देशी-विदेशी दारू कंपन्यांची हुबेहूब नक्कल करून बनावट दारू तयार करणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी रात्री सात ते साडेसातदरम्यान अचानक धाड टाकून कारवाई केली. भरलेल्या आणि रिकाम्या दारूच्या बाटल्या, झाकण, लेबल आणि दारू तयार करण्याचेे साहित्य जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.
इम्तियाज इस्माईल शेख (वय-३५) आणि इस्माईल नसरोद्दीन शेख (दोघे रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तीन महिन्यांपासून या कारखान्यात देशी-विदेशी बनावट मद्य तयार होत असल्याची कुणकुण एक्साईचे दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड यांना लागली. त्यानुसार त्यांनी एक्साईजच्या विविध पथकांच्या मदतीने शुक्रवारी रात्री कारखान्यावर अचानक छापा घातला असता तेथील गैरप्रकार उजेडात आला.
आयबी (इंपिरियल ब्लू), रॉयल स्टॅग, मॅकडॉल नंबर वन आणि देशी गणलेली टँगो पंच दारूच्या रिकाम्या आणि भरलेल्या बाटल्या, झाकण, लेबल, स्पिरिट, तयार ब्लेंड, दारू तयार करण्यासाठी लागणारी मशीन आणि इतर साहित्य असा १ लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त केला. अधीक्षक सागर धोमकर, उपअधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र पाटील, दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड, प्रशांत निकाळजे, महिबूब शेख, मनीषा मिसाळ, राहुल बांगर, एस. बी. साळुंखे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, कॉन्स्टेबल मयूर भोसेकर, रेवणसिद्ध कांबळे, गणेश सुळे, अलीम शेख, चेतन व्हनगुंटी, योगीराज तोग्गी, राजेंद्र ठाकूर, महिला कॉन्स्टेबल शाहीन शेख, भाग्यश्री शेरखाने, प्रियंका कुटे, वाहनचालक संजय नवले, निशांत मिसाळ या जॅम्बो पथकाने ही धाडसी कारवाई केली. तपास दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड करीत आहेत. (प्रतिनिधी)
इन्फो बॉक्स
बनावट दारू कुठे जात होती?
तीन महिन्यांपासून चालत असलेल्या या कारखान्यातून तयार होणारी दारू शहर आणि परिसरात कुठे विकली जात होती. शहरातील कुठल्या परमिट रुम, बीअर बारमध्ये, शहराबाहेरील ढाब्यांवर बनावट दारू कंपनी रेटमध्ये विकली जायची का? या सर्व प्रश्नांचे उत्तर आता तपास करताना शोधावे लागणार असल्याचे तपास अधिकारी तथा दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड यांनी सांगितले.
जोड आहे....

Web Title: Execution proceedings on fake liquor manufacturing plant: seized liquor products; Both of them are in control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.