अफजल गुरूला फाशी देणे चूक होते

By Admin | Updated: February 10, 2015 03:51 IST2015-02-10T03:51:11+5:302015-02-10T03:51:11+5:30

संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफजल गुरू याच्या फाशीला सोमवारी दोन वर्षे पूर्ण होत असतानाच, गुरूची फाशी ‘चूक’ होती,

The execution of Afzal Guru was wrong | अफजल गुरूला फाशी देणे चूक होते

अफजल गुरूला फाशी देणे चूक होते

नवी दिल्ली : संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफजल गुरू याच्या फाशीला सोमवारी दोन वर्षे पूर्ण होत असतानाच, गुरूची फाशी ‘चूक’ होती, असे वक्तव्य काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केले आहे़ त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे़
माझ्या मते, अफजल गुरूची फाशी चूक होती आणि ज्याप्रकारे ती दिली गेली, ते गैर होते़ गुरूच्या कुटुंबियांना यासंदर्भात माहिती द्यायला हवी होती आणि त्यांना गुरूच्या अखेरच्या भेटीची संधी मिळायला हवी होती़ शिवाय त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करायला हवा होता, असे टिष्ट्वट थरूर यांनी केले आहे़ थरूर यांच्या वक्तव्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या पाच काँग्रेस आमदारांनी गुरूची फाशी चूक असल्याचे म्हटले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The execution of Afzal Guru was wrong