शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माफ करा, सर्वांसमोर प्रायश्चित्त घेण्यास तयार; कोर्टाच्या अवमानाबद्दल पतंजलीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 05:20 IST

उत्साहाच्या भरात झाले. यापुढे आम्ही लक्षात ठेवू, असे बाबा रामदेव म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आधुनिक चिकित्सा पद्धतींविरुद्ध प्रसिद्ध केलेल्या भ्रामक जाहिराती, तसेच ॲलोपॅथिक औषधांविरुद्ध वक्तव्य करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून मंगळवारी पतंजली आयुर्वेदने एका आठवड्यात जाहीर माफी मागण्याची तयारी दर्शविली. न्यायालयाने पतंजलीची माफी स्वीकारलेली नसून, याप्रकरणी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी ठेवली आहे.

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या पीठापुढे हजर होऊन पतंजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण आणि सहसंस्थापक योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्तिशः माफी मागितली. न्यायालयाला हमी देऊनही त्याचे उल्लंघन का केले, याविषयी विचारणा करताना न्यायमूर्तींद्वयांनी सुनावणीदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना चांगलेच फटकारले. आम्ही त्यावेळी जे केले ते करायला नको होते. ते उत्साहाच्या भरात झाले. यापुढे आम्ही लक्षात ठेवू, असे बाबा रामदेव म्हणाले.

हात जोडून म्हणाले...न्यायमूर्ती कोहली रामदेव यांना म्हणाले, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची खूप प्रतिष्ठा आहे... लोक तुमच्याकडे बघतात, तुमच्या कामांची प्रशंसा करतात. तुम्ही योगासाठी खूप काम केले आहे. मात्र, तुम्ही आधुनिक चिकित्सा पद्धतीला चुकीचे ठरवू शकत नाही. तुम्ही तुमचे काम करा. तुम्ही चांगले काम करत आहात. यावेळी रामदेव हात जोडून म्हणाले की, माझ्याकडून जी काही चूक झाली आहे, त्याबद्दल मी बिनशर्त माफी मागितली आहे.

तुम्ही मनापासून माफी मागत नाही...बालकृष्ण यांनी रामदेव यांचा कंपनीच्या दैनंदिन व्यवहाराशी काहीही संबंध नसल्याचे सांगताच पीठाने नाराजी व्यक्त केली. न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह म्हणाले की, तुम्ही पुन्हा तुमच्या भूमिकेवर ठाम आहात. तुम्ही मनापासून माफी मागितलेली दिसत नाही. त्यावर रोहतगी म्हणाले की, आम्ही सार्वजनिक माफी मागायला तयार आहोत. यामुळे आम्हाला लोकांसमोर पश्चात्ताप करता येईल. आम्ही न्यायालयाकडे दुर्लक्ष करत नाही.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजली