शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

युद्ध झाल्यास भारतीय फायटर जेट चीनवर करतील मात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 18:52 IST

जर हवाई युद्ध झालंच, तर भारताकडून चीनचा पराभव निश्चित आहे.

नवी दिल्ली, दि. 9 - गेल्या काही दिवसांपासून भारत-चीनदरम्यान वाद उफाळून आला असून, चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत आहे. तसेच एखाद्या वेळेस डोंगर हलवणं शक्य आहे, मात्र चीनच्या लष्करावर कोणीही मात करू शकत नाही, असंही चीननं म्हटलं होतं. मात्र जर हवाई युद्ध झालंच, तर भारताकडून चीनचा पराभव निश्चित आहे.भारताच्या लढाऊ विमानांसमोर चीनची विमानं तग धरू शकत नाहीत. भारताचं मिराज-2000 हे लढाऊ विमान हाताळणारे स्क्वाड्रन लीडर समीर जोशी यांनी ही माहिती दिली आहे. भारत व चीन या दोन्ही देशांतील हवाई दलाच्या सामर्थ्याचा अभ्यास करून समीर जोशींनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात त्यांनी भारत आणि चीनच्या कमकुवत आणि मजबूत बाजू सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. द ड्रॅगन क्लॉज: असेसिंग चायना पीएलएएएफ (The Dragon’s Claws: Assessing China’s PLAAF Today) या अहवालात दोन्ही देशांमधील हवाई दलाच्या सामर्थ्याची माहिती देण्यात आली आहे. भारत-चीनमध्ये तिबेट आणि आसपासच्या भागात युद्ध झाल्यास भारतीय हवाई दल चीनवर नक्कीच मात करेल, असं या अहवालात म्हटलं आहे.चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सची (पीएलएएएफ) अनेक विमानतळं तिबेटच्या पठाराच्या खूप खाली आहेत. त्यामुळे उड्डाण करत तिबेटच्या पठारावर येण्यासाठी विमानाला भरपूर मोठं उड्डाण करावं लागणार आहे. विमान तिबेटच्या पठारावर येईपर्यंत विमानाचे बरंच इंधन कमी होईल. त्यामुळे साहजिकच विमानाच्या इंजिनावर मोठा ताण पडेल. या सर्व प्रकारामुळे विमानाच्या वेगावरही मर्यादा येतील आणि लढाऊ विमानांचा वेग मंदावेल, असंही समीर जोशी म्हणाले आहेत. मात्र या बाबतीत भारत चीनपेक्षा उजवा आहे. भारताची तेजपुर, कलाईकुंडा, छाबुआ आणि हाशीमारा ही विमानतळं येथे आहेत. तिबेटच्या पठाराची उंची आणि भारताची विमानतळं असलेल्या जागांची उंची यात मोठं अंतर नाही. त्यामुळे भारताची विमानं तिबेटच्या आकाशात चिनी विमानांच्या तुलनेत कमी इंधन वापरून उंचीवरून हल्ला करण्यास सक्षम आहेत, असे समीर जोशी म्हणाले आहेत.