शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार; समोर आला घटनेचा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 21:59 IST

Asaduddin Owaisi : यापूर्वी ओवेसी यांनी आपल्या गाडीवर गोळीबार झाल्याचं सांगत तीन-चार राऊंड फायर केल्याची माहिती दिली होती.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Assembly Elections) कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi)  यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. त्यांच्या गाडीवर तीन-चार राऊंड फायर झाले. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनीच ट्वीट करून गाडीवर गोळीबार झाल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एमआयएमच्या मुंबईच्या सेक्रेटरी झोहरा खान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं आहे.

या व्हिडीओमध्ये एक लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला व्यक्ती टोल नाक्यावरुन जात असलेल्या ओवेसी यांच्या गाडीकडे धावत जाताना दिसत आहे. तसंच या व्हिडीओमध्ये हल्लेखोर त्यांच्या गाडीवर फायरिंग करुन पळण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत दिसत आहे. परंतु त्यातला एक हल्लेखोर गाडीवर आदळून खाली पडताना दिसतोय. यादरम्यान एक हल्लेखोर आपल्या हातात बंदूक घेऊन फायरिंग करतानाही दिसत आहे. दरम्यान, यानंतर हापुडचे एसपी दीपक भुकर यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे.  तपासासाठी पाच टीमउत्तर प्रदेश हापुड जिल्ह्यात असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर फायरिंग केल्याच्या घटनेच्या तपासाबाबत प्रदेशाचे एडीजी (लॉ अँड ऑर्डर) प्रशांत कुमार यांनी माहिती दिली. एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी ५ टीम तयार केल्याचे ते म्हणाले. मेरठचे आयजी या प्रकरणावर स्वत: लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनUttar Pradeshउत्तर प्रदेश