शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

यू आर बॉम्बर! तरुण-तरुणीच्या ‘चॅटिंग’मुळे खळबळ, मुंबईला येणारे विमान ६ तास ‘लटकले’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 06:59 IST

flight : ही घटना रविवारी, १४ ऑगस्ट रोजी इंडिगो कंपनीच्या विमानात घडली. एक मुलगा मंगळुरूहून मुंबईला निघाला होता. तो त्याच्या मैत्रिणीशी फोनवर ‘चॅटिंग’ करत होता.

मंगळुरू : कर्नाटकातील मंगळुरू येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. तरुण आणि तरुणीच्या ‘व्हॉट्सॲप चॅटिंग’मुळे खळबळ उडाली. यामुळे मुंबईला येणाऱ्या विमानाला तब्बल सहा तास उशीर झाला. एवढेच नाही तर सर्व प्रवाशांना विमानातून उतरावे लागले आणि सखोल तपासणीनंतरच त्यांना विमानात प्रवेश मिळाला. 

ही घटना रविवारी, १४ ऑगस्ट रोजी इंडिगो कंपनीच्या विमानात घडली. एक मुलगा मंगळुरूहून मुंबईला निघाला होता. तो त्याच्या मैत्रिणीशी फोनवर ‘चॅटिंग’ करत होता. मुलगी त्या मुलाला ‘तू बॉम्बर आहेस’ असा मेसेज पाठवते. पण,  त्याच्या बाजूला बसलेल्या महिला प्रवाशाची अचानक या मेसेजवर नजर पडते आणि नंतर एकच गोंधळ उडतो.

अलर्टनंतर विमान माघारीती महिला प्रवासी तातडीने विमानातील क्रू मेंबर्सना संशयास्पद मेसेजबाबत माहिती देते. लगेच पायलटलाही याबाबत कल्पना दिली जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर पोहचणार होते, त्याचवेळी पायलट हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला माहिती देतो आणि तातडीने विमानाला माघारी वळवले जाते. 

दोघांचीही चौकशीही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुलगा आणि मुलगी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. मुलगा मंगळुरूहून मुंबईला तर मुलगी बंगळुरूला निघाले होते. चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. दोघे गमतीने बोलत असल्याचे समोर आले. दोघेही मित्र असून आपापसात सुरक्षेबद्दल मस्करी करत होते. शहर पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांनी ही घटना दोन मित्रांमधील व्हॉट्सॲपवर वैयक्तिक चॅटिंगची होती, असे सांगितले. सुरक्षेबाबत दोन मित्रांमध्ये मैत्रीपूर्ण संभाषण होते, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचेही शशी कुमार म्हणाले. 

६ तासांनंतर उड्डाणदरम्यान, विमान माघारी आल्यानंतर प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रवासी पुन्हा चढले आणि १८५ प्रवाशांसह संध्याकाळी ५ वाजता विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतले. पण, उडालेला गोंधळ आणि नंतरची चौकशी यामुळे तरुणाला त्या विमानातून प्रवास करता आला नाही. तर, तरुणीचेही विमान ‘मिस’ झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अशी घटना घडल्यामुळे विमानतळावर मात्र चांगलीच धावपळ उडाली.

टॅग्स :Indigoइंडिगोairplaneविमान