शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अणुप्रकल्पांच्या यादीची भारत, पाककडून देवाण-घेवाण, दरवर्षी १ जानेवारीला होते नियमाचे पालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:19 IST

दोन्ही देशांनी एकमेकांच्या अणुप्रकल्पांवर हल्ले करायचे नाहीत, असा करार करण्यात आला होता.

नवी दिल्ली : भारतपाकिस्तानने आपापल्या अणुप्रकल्पांच्या यादीची रविवारी देवाण-घेवाण केली. कितीही मोठा संघर्ष उद्भवला तरी दोन्ही देशांनी परस्परांच्या अणुप्रकल्पांवर हल्ला करायचा नाही, असे एका कराराद्वारे ठरविण्यात आले होते.दोन्ही देशांनी एकमेकांच्या अणुप्रकल्पांवर हल्ले करायचे नाहीत, असा करार करण्यात आला होता. भारत, पाकिस्तान १ जानेवारी १९९२ पासून आपापल्या अणुप्रकल्पांच्या यादीची देवाण-घेवाण करतात. गेल्या तीन दशकांपासून दरवर्षी १ जानेवारीला या गोष्टीचे पालन केले जाते. पाकिस्तानमधील अणुप्रकल्पांची यादी त्या देशाच्या अधिकाऱ्याने इस्लामाबाद येथील भारतीय राजदूतावासाला रविवारी सादर केली,  तसेच भारतातील अणुप्रकल्पांची यादी पाकिस्तानच्या दिल्लीतील राजदूतावासाला सादर करण्यात आली आहे. पाकिस्तानातून भारतात दहशतवादी कारवाया होत असतात. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान भारताची कुरापत काढत असतो. या गोष्टींमुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. मात्र या गोष्टींचा अणुप्रकल्पांची यादी परस्परांना देण्याच्या कृतीवर काहीही परिणाम झालेला नाही. (वृत्तसंस्था)

‘६३१ भारतीय मच्छीमार, दोन नागरिकांची पाकिस्तानी तुरुंगातून मुक्तता करा’पाकिस्तानने ६३१ भारतीय मच्छीमार व दोन नागरिकांची तुरुंगातून मुक्तता करून त्यांची भारतामध्ये पाठवणी करावी. या कैद्यांनी त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे, असे भारताने म्हटले आहे. त्याशिवाय आणखी ३० भारतीय मच्छीमार व २२ नागरिक पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले असून, त्यांना भेटण्याची परवानगी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना द्यावी, असेही भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. 

३९ पाकिस्तानी नागरिक, ९५ मच्छीमार भारतातील तुरुंगात ३ कैदभारत-पाकिस्तानने परस्परांचे नागरिक कैद केले असून, त्यांच्या यादीची दरवर्षी १ जानेवारी व १ जुलैला देवाण-घेवाण करण्यात येते. भारतीय तुरुंगात सध्या ९५ पाकिस्तानी मच्छीमार व ३३९ नागरिक आहेत. आपापल्या नागरिकांची तुरुंगातून लवकर सुटका व्हावी म्हणून दोन्ही देश प्रयत्नशील असतात.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान