शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून अतिरिक्त जमिनींची होणार विक्री; रेल्वे, संरक्षण मंत्रालयाकडे २९.७५ लाख एकर जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 06:56 IST

या अतिरिक्त जमिनींवर नव्या पायाभूत सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या मंत्रालयांच्या अतिरिक्त जमिनींवर उभारल्या जाणाऱ्या व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा यासंबंधीच्या योजनेला मंजुरीही देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : महत्त्वाच्या मंत्रालय आणि विभागांच्या रिकाम्या असलेल्या अतिरिक्त जमिनींचा वापर आता केंद्र सरकार पैसा उभारण्यासाठी करणार आहे. यात रेल्वे, दूरसंचार आणि संरक्षण मंत्रालयांच्या अखत्यारित असलेल्या जमिनींचा समावेश असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

या अतिरिक्त जमिनींवर नव्या पायाभूत सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या मंत्रालयांच्या अतिरिक्त जमिनींवर उभारल्या जाणाऱ्या व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा यासंबंधीच्या योजनेला मंजुरीही देण्यात आली आहे.

केंद्राने या योजनेला मान्यता दिल्यानंतर रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयाने आपापल्या ताब्यात असलेल्या अतिरिक्त जमिनींच्या व्यावसायिक वापरासाठीची योजना आखायलाही सुरुवात केली आहे. पायाभूत सुविधांच्या उभारण्याच्या या योजनेचा सर्वाधिक लाभ बीएसएनएल या सरकारी कंपनीला मिळू शकतो. बीएसएनएलने आपल्या ताब्यातील किमान एक डझनभर रिकाम्या अतिरिक्त जमिनींची निश्चिती केली आहे. या जमिनींवर कामे लवकरच सुरू केली जाणार आहेत.

रेल्वे मंत्रालयानेही आपल्याकडील अतिरिक्त जमिनींचा व्यावसायिक लाभ मिळवण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग आहे.

कुणाच्या ताब्यात किती जमीन?च्रेल्वे व संरक्षण मंत्रालयाकडे सर्वात जास्त सरकारी जमीन आहे. रेल्वेकडे सध्या ४.७८ लाख हेक्टर (११.८० लाख एकर) जमीन आहे. त्यापैकी ४.२७ लाख हेक्टर जमीन रेल्वे आणि इतर सहयोगी संस्थांच्या वापरात आहे, तर ०.५१ लाख हेक्टर (१.२५ लाख एकर) जमीन तशीच पडून आहे. संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असलेली १७.९५ लाख एकर जमीन तशीच वापराविना आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर संरक्षण मंत्रालयाने आपल्या रिकाम्या जमिनींचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीrailwayरेल्वे