शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:34+5:302014-12-20T22:27:34+5:30
नांदेड : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा भरविण्यात आला़ विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला़

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
न ंदेड : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा भरविण्यात आला़ विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला़ माजी प्राचार्य संपत यांनी शासकीय तंत्रनिकेतनचा विकास कशा प्रकारे झाला याबाबत विवेचन केले़ दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यासह माजी संचालक भालचंद्र चोपणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले़ माजी विद्यार्थी राहूल देशपांडे यांनी कॅम्पस निवडीमध्ये आजी विद्यार्थ्यांना ला देणार असे सांगतानाच माजी विद्यार्थी असोसिएशनच्यावतीने संस्थेच्या विकासात योगदान देणार असल्याचे सांगीतले़ वर्षनिहाय छायाचित्रणाचा कार्यक्रम पार पडल्यावर सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला़ गणेश रावत शिवसुराणा, उद्योजक गिरीष मगर, एऩएस़ कुलकर्णी, प्रा़ उस्केवार यांनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी प्रा़ व्ही़टी़गिरी, कार्यालयीन अधीक्षक व्ह़ी़जे़ निलावार, ग्रंथपाल व्ही़जे़ आंबटवार, प्रबंधक खैमोद्दीन, कुंभार, टी़जी़ यादगीरवाड, सरदार अली खान, प्रा़ पी़डी़ पोपळे, ॲड़ शेषेराव मोरे, प्राचार्य संपत, डॉ़ एस़एच़ काद्री, एस़एम़ खासिम, पालवे, कुंभार, प्रा़ यादव, प्रा़ सोनवणे आदी उपस्थित होते़