माजी सैनिक आत्महत्या प्रकरण - केजरीवालांची अखेर पोलिसांच्या तावडीतून सुटका

By Admin | Updated: November 3, 2016 01:54 IST2016-11-02T22:49:44+5:302016-11-03T01:54:03+5:30

वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर माजी सैनिक राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर दिल्लीमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे.

Ex-servicemen suicide case - Kejriwal finally gets bail from police custody | माजी सैनिक आत्महत्या प्रकरण - केजरीवालांची अखेर पोलिसांच्या तावडीतून सुटका

माजी सैनिक आत्महत्या प्रकरण - केजरीवालांची अखेर पोलिसांच्या तावडीतून सुटका

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर माजी सैनिक राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर दिल्लीमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे.  येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात गरेवाल यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र थोड्या वेळापूर्वीच केजरीवालांना पोलिसांनी सोडून दिलं आहे. 
अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी आर. के. पुरम पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. याचबरोबर, आज कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिरोदिया यांनाही दिल्ली पोलिसांनी माजी सैनिक राम किशन गरेवाल यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले असता ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका केली. राहुल गांधी यांना दिवसभरात पोलिसांनी दोन वेळा ताब्यात घेतले व सुटका केली. 
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव राम मनोहर लोहिया रुग्णालयात कोणालाही प्रवेश दिला जात नसून गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  

Web Title: Ex-servicemen suicide case - Kejriwal finally gets bail from police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.