माजी सैनिकांचे उपोषण सुरू
By Admin | Updated: June 16, 2015 02:36 IST2015-06-16T02:36:42+5:302015-06-16T02:36:42+5:30
वन रँक, वन पेन्शन’च्या अंमलबजावणीस केंद्र सरकार उशीर करीत असल्याच्या विरोधात निवृत्त लष्करी अधिकारी आणि सैनिकांनी

माजी सैनिकांचे उपोषण सुरू
नवी दिल्ली : ‘वन रँक, वन पेन्शन’च्या अंमलबजावणीस केंद्र सरकार उशीर करीत असल्याच्या विरोधात निवृत्त लष्करी अधिकारी आणि सैनिकांनी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले.
राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे जालंधर जिल्ह्यातील ५५ माजी सैनिक साखळी उपोषणावर बसले. विविध शहरातही माजी सैनिकांनी साखळी उपोषण सुरूकेले. आमची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूराहील, असे इंडियन एक्स सर्व्हिसमेन मूव्हमेंटचे मीडिया सल्लागार कर्नल (निवृत्त) अनिल कौल यांनी सांगितले. मोदी सरकारने आम्हाला ‘वन रँक, वन पेन्शन’ लवकरात लवकर लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. यासंदर्भात सरकारने कुठलीही घोषणा केलेली नाही, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)