शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 17:38 IST

ECI chief Rajiv Kumar : ईव्हीएमबाबत आमच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींना आम्ही उत्तर देऊ आणि त्या प्रसिद्धही करू, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच ईव्हीएमसंदर्भात निवडणूक आयोगाने भाष्य केले आहे. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. दरम्यान, इस्रायल जर लेबनॉनमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी हिजबुल्ला पेजर हॅक करू शकतो, तर ईव्हीएम हॅक करता येणार नाही का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर राजीव कुमार म्हणाले, पेजर कनेक्टेड असतो. ईव्हीएम नाही. ईव्हीएमशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत.  

ईव्हीएमबाबत आमच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींना आम्ही उत्तर देऊ आणि त्या प्रसिद्धही करू, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. राजीव कुमार म्हणाले, आम्ही ईव्हीएमवरील सर्व २० तक्रारींना व्यक्तिगतपणे वस्तुस्थितीनुसार उत्तर देऊ. ईव्हीएमची संपूर्ण यंत्रणा सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. तसेच, प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांचे एजंट हजर असतात. ईव्हीएममध्ये बॅटरी टाकल्यावर त्यावर एजंटची सहीही असते. मतदानाच्या ५ ते ६ दिवस आधी चिन्ह लावली जातात. मशीन तसेच बॅटरीवरही एजंटची सही असते आणि ती सील केलेली असते, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

"ईव्हीएमशी छेडछाड करणे शक्य नाही" मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ईव्हीएमशी छेडछाड शक्य नाही. ते म्हणाले, 'ईव्हीएमबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हॅकिंग होऊ शकतं, इथलं मतदान तिकडे जाऊ शकतं, असे आधी म्हटले जात होते. मात्र, आता पुढे काय म्हटले जाणार, याचाही विचार आम्ही करत आहोत, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

महाराष्ट्र-झारखंडमधील निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला पहिला टप्पा आणि २० नोव्हेंबरला निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडेल. तसेच, २३ नोव्हेंबरला झारखंडमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtraमहाराष्ट्रJharkhandझारखंडElectionनिवडणूक 2024EVM Machineईव्हीएम मशीन