शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

EVM ला बाय बाय, पुढच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे? राम माधव यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 13:52 IST

मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या इव्हीएमच्या विश्वसनियतेवर वर विविध राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांकडून वारंवार शंका उपस्थित करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडूनही इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यासाठी सहमती दर्शवण्यात येत आहे.

नवी दिल्ली -  मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या इव्हीएमच्या विश्वसनियतेवर वर विविध राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांकडून वारंवार शंका उपस्थित करण्यात येत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही वेळोवेळी इव्हीएमविरोधी सूर आळवला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडूनही इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यासाठी सहमती दर्शवण्यात येत आहे. जर सर्वपक्षांचे एकमत झाले तर भविष्यात इव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत भाजपाकडून मांडण्यात आले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या 84 व्या महाअधिवेशनात मतपत्रिकेद्वार मतदान घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे महासचिव राम माधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही माहिती दिली. माधव म्हणाले, मतपत्रिकेऐवजी इव्हीएमने मतदान घेण्याचा निर्णय व्यापक स्तरावर सहमती झाल्यावर घेण्यात आला होता. आता आज जर प्रत्येक पक्षाने पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास सहमती देण्याबाबत विचार सुरू केला तर आम्हीसुद्धा याबाबत विचार करू शकतो.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुका आटोपल्यानंतर अनेक पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार असल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर गुजरात विधानसभा निवडणुकीमधील भाजपाच्या विजयानंतर हार्दिक पटेलसह विविध नेत्यांनी इव्हीएम हेच भाजपाच्या विजयाचे कारण असल्याचे सांगितले होते.  

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारतBJPभाजपा