शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्यांचं लक्ष पैशांवर! चिठ्ठी लिहून महिला डॉक्टरने घेतलं जीवघेणं इंजेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 14:09 IST

Kerala Crime News: केरळमधील तिरुवनंतपुरम येथे एका मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी एका डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. या डॉक्टरवर हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे.

केरळमधील तिरुवनंतपुरम येथे एका मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी एका डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. या डॉक्टरवर हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. सरकारी मेडिकल कॉलेजमधील सर्जरी विभागातील पीजी स्टुडंट शहाना (२६) ही तिच्या फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

प्रसारमाध्यमांतील रिपोर्टनुसार या महिला डॉक्टरने जीवन संपवण्यासाठी अॅनेस्थेटिकची अधिक मात्रा असलेले इंजेक्शन टोचून घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपार्टमेंटमध्ये एक कथित चिठ्ठी सापडली आहे. त्यावर लिहिले होते की, सर्वांना केवळ पैसे हवे आहेत. दरम्यान, मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, डॉक्टर असलेल्या तिच्या मित्राने हुंड्याचं कारण देत लग्नाला नकार दिल्याने गेल्या काही काळापासून शहाना ही निराश होती. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, नातेवाईकांच्या जबाबांच्या आधारावर या महिला डॉक्टर विद्यार्थिनीचा मित्र रुवेस याला गुरुवारी सकाळी करुनागपल्ली येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. रुवेस हासुद्धा कॉलेजमध्ये डॉक्टर आहे. मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनंतर अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी पुढे सांगितले की, डॉ. शहाना हिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबांच्या आधारावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आणि हुंडा प्रतिबंधक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काळ बदलला तरी भारतीय समाजातील हुंडा पद्धती अद्याप अस्तित्वात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सोमवार ४ डिसेंबर रोजी एनसीआरबीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ अंतर्गत १३ हजार ४७९ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. तर २०२२ मध्ये ६ हजार ४५० हुंडाबळींची नोंद झाली आहे.  

टॅग्स :dowryहुंडाCrime Newsगुन्हेगारीKeralaकेरळ