शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"भारतात राहणारा प्रत्येकजण 'हिंदू' आहे",  मोहन भागवत यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 07:53 IST

Mohan Bhagwat : छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर येथील कार्यालयात स्वयंसेवकांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत बोलत होते.

छत्तीसगड : देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती 'हिंदू' (Hindu) आहे आणि सर्व भारतीयांचा (Indians) डीएनए (DNA) समान आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मंगळवारी (15 नोव्हेंबर) केले. तसेच, कोणीही धार्मिक विधी करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. 

छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर येथील कार्यालयात स्वयंसेवकांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत यांनी विविधतेतील एकता याबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की, ही भारताची प्राचीन विशेषता आहे. संपूर्ण जगात हिंदू धर्म ही एकमेव कल्पना आहे, जी सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते. 

मोहन भागवत पुढे म्हणाले की, "आरएसएसची स्थापना (1925 साली)  झाल्यापासून मी ठामपणे सांगत आलो आहे की, भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. जे लोक भारताला आपली मातृभूमी मानतात आणि या विविधता असूनही एकतेच्या संस्कृतीवर विश्वास ठेवून एकत्र राहू इच्छितात, ते हिंदू आहेत. धर्म, संस्कृती, भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा विचारसरणी काहीही असो, सर्व हिंदूच आहेत, या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत."

'संघाच्या शाखेत कोणाची जात विचारली जात नाही'देशात पूर्वीच्या तुलनेत आता स्वयंसेवकांची संख्या वाढली आहे. देशभरात झपाट्याने वाढणारा हा संघ अतिशय अनोखा आहे. संघाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण संघाची तुलना कोणाशीही करू शकत नाही. जर आपल्याला संघाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला त्यात सामील व्हावे लागेल. जेव्हा आपण संघात सामील होऊ, तेव्हा संघाची महानता समजून येईल. संघाच्या शाखेत कोणाची जात विचारली जात नाही, असे मोहन भागवत म्हणाले.

'सर्व भारतीयांचा डीएनए समान'संघाचे कार्य वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवणे आणि लोकांमध्ये एकता आणणे आहे, असेही संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले. तसेच, त्यांनी प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करण्यावर भर दिला आणि सांगितले की, सर्व भारतीयांचा डीएनए समान आहे आणि त्यांचे पूर्वज समान आहेत. 40,000 वर्षे जुन्या 'अखंड भारत'चा भाग असलेल्या प्रत्येक भारतीयाचा डीएनए समान आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ