शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत प्रत्येकाला स्वत:चे घर; लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:57 IST

येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली  - येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली.७२व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, कोट्यवधी तरुणांना रोजगार, प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, प्रत्येक घरात वीजपुरवठा अशा स्वप्नांची मालिकाच उभी केली आणि देशाचा विकास वेगाने करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्या नेतृत्वाखालील सरकार हाच एकमात्र पर्याय देशापुढे असल्याचे सांगत एक प्रकारे निवडणुकांच्या तयारीचे बिगुल फुंकले.‘हम मख्खनपर नहीं पत्थरपर लकीर खिंचनेवाले लोग है’ असे आत्मविश्वासाने सांगताना निद्रिस्त अवस्थेतील भारताला चार वर्षांत आम्ही जागेच केले नाही, तर त्याचे वेगवान मार्गक्रमणही सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला. भारताची जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सांगत वस्तू व सेवा कराने (जीएसटी) भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली. मुद्रा बँक योजनेमुळे १३ कोटी तरुणांना कर्जपुरवठा झाला. चार कोटी तरुणांनी आयुष्यात प्रथमच कर्ज घेतले. स्वच्छ भारत अभियानामुळे लक्षावधी बालके अनारोग्यापासून वाचली, असे मोदी म्हणाले.अवकाशात फडकविणार तिरंगाअंतराळ क्षेत्रात वैज्ञानिकांनी प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केली असून २0२२ साली भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या वर्धापन दिनी अवकाशवीर तिरंगा हातात घेऊन अंतराळात जाईल आणि अंतराळाला गवसणी घालणारा भारत जगातील चौथा देश बनेल.सैन्यात महिलांना बरोबरीचे स्थानसर्जिकल स्ट्राईकद्वारे शत्रूंना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे. महिलांनाही लवकरच सशस्त्र दलांमध्ये बरोबरीचे स्थान दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही पंतप्रधानांनी केली.मोदींना राफेलवर खुल्या चर्चेचे आव्हाननवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण पोकळ असल्याचे सांगत काँग्रेसने मोदींना राफेल सौद्यासह अन्य मुद्द्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. - सविस्तर वृत्त/९सरकारविषयी देशात चार वर्षांपूर्वी असलेली नकारात्मक भावना बदलून टाकण्यात आम्ही यशस्वी झालो, असे नमूद करीत पंतप्रधान म्हणाले, देशात भ्रष्टाचारी, मध्यस्थ अन् दलाल नष्ट झाले आहेत. ईशान्य भारतातील गावांत पहिल्यांदा वीज पोहोचली, तेव्हा सारे गाव आनंदाने नाचले. भारताच्या या दुर्लक्षित भागात विकासाच्या अनेक योजना सुरू आहेत. दिल्ली या राज्यांच्या दारात उभी करण्यात माझे सरकार यशस्वी ठरले.आपल्या ८२ मिनिटांच्या प्रदीर्घ भाषणात मोदींनी शेतकरी, ओबीसी, दलित, नव्या पिढीतील तरुण, महिला, तीन तलाक, काश्मीर, दक्षिण भारत, सैन्यदल, न्यायालये, शिक्षण, इंटरनेट, अर्थकारण, अंतराळातील झेप असे विविध विषय आणि त्यांच्याशी निगडित भविष्यातील योजनांचा उल्लेख केला. ‘जिद है एक सूर्य उगाना है, अंबरसे उंचा जाना है’ अशा काव्यपंक्ती सादर करीत मजबूत भारताचे चित्रच सादर केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnewsबातम्याIndependence Dayस्वातंत्र्य दिवस