देहाचा प्रत्येक कण देशासाठी

By Admin | Updated: May 17, 2014 03:00 IST2014-05-17T03:00:42+5:302014-05-17T03:00:42+5:30

‘स्वराज्य के लिए मर नही पाये, लेकिन अब सुराज्य के लिए जीनेका सौभाग्य मील रहा है’’- मोदी

Every particle of the body for the country | देहाचा प्रत्येक कण देशासाठी

देहाचा प्रत्येक कण देशासाठी

बडोदा : ‘‘स्वराज्य के लिए मर नही पाये, लेकिन अब सुराज्य के लिए जीनेका सौभाग्य मील रहा है’’- अशा शब्दांत सत्तेच्या सोपानावर पहिले पाऊल ठेवणार्‍या नरेंद्र मोदी यांनी नियतीशी होत असलेल्या एका नव्या कराराचे सूतोवाच केले आणि बडोदा येथे झालेल्या त्यांच्या विशाल विजयसभेमधल्या रणभेदी दुंदुभी जणू गगनाला जाऊन भिडल्या. माझ्या शरीराचा प्रत्येक कण आणि मला उपलब्ध असलेल्या वेळातला प्रत्येक क्षण यापुढे देशाच्या कारणी लागेल, असे ठाम वचन देणारे मोदी म्हणाले, मी किती काळ काम करू शकतो आणि किती घाम गाळू शकतो, हे देशाने पाहिले आहेच. एरवी मला पाण्यात पाहणारे विरोधक असोत किंवा सतत माझ्या विरोधात असणारी माध्यमे, माझ्या काम करण्याच्या क्षमतेबद्दल त्यांच्यातही एकमत आहे. माझ्याइतका घाम गाळणारा कामगार या देशाला दुसरा मिळाला नसता. त्या अर्थाने मी मजूर नंबर वनच आहे! सातत्याने उठणार्‍या जयघोषाने अख्खे मैदान दणदणून सोडणार्‍या बडोद्यातील समर्थकांनी मोदींच्या भाषणाचा विजयरथ अनेक वेळा रोखून धरला आणि ‘पहले आप, फिर मेरी बारी’ म्हणत मोदींनींही ‘हर हर मोदी’च्या जयघोषाच्या निखार्‍यांवर फुंकरच घातली. ‘‘मंै आपको सिर्फ पचास मिनिट दे पाया था, लेकिन आपने तो पाच लाखसेभी ज्यादा व्होट मुझे दिये है,’’ अशा शब्दांत त्यांनी मतदारांचे विनम्र आभार मानले. एवढेच नव्हे, तर सयाजीराव गायकवाडांनी आश्रय दिला नसता, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व या देशाला लाभले नसते, या संदर्भाचा नेमका उपयोग करून बडोदेकरांच्या जयघोषाबरोबर एक वेगळे धृवीकरणही नेमकेपणे साधले.

Web Title: Every particle of the body for the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.