अखेर रस्त्या कामाला सुरुवात वाहनधारकांतून समाधान : उजनी मोड- कमालपूर रस्ता
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:40+5:302015-01-30T21:11:40+5:30
उजनी : औसा तालुक्यातील उजनी मोड ते उमरगा तालुक्यातील कमालपूर या रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपासून गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडले होते़ परिणामी, वाहनधारकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच बुधवारपासून या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे़

अखेर रस्त्या कामाला सुरुवात वाहनधारकांतून समाधान : उजनी मोड- कमालपूर रस्ता
न गपूर : याचिकाकर्त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना अकोला येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेश देण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला.परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी दलालांना परिवहन कार्यालयातून हाकलून लावण्याचे निर्देश जारी केले आहेत. यामुळे अकोला येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांसह विविध कंपन्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आला होता. याविरुद्ध अकोला शहर ट्रक मालक संघटना व इतर १५ जणांनी रिट याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या ६ जून २००२ रोजीच्या निर्णयानुसार आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रतिनिधींना प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची परवानगी आहे. परंतु, अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात येत आहे, अशी याचिकाकर्त्यांची तक्रार आहे. याचिकेत राज्य शासनाच्या गृह विभागाचे मुख्य सचिव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव, परिवहन आयुक्त व प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना तात्पुरता दिलासा देऊन सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. प्रतिवादींना २० फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.