अखेर मल्ल्यांचा राजीनामा स्वीकारला

By Admin | Updated: May 4, 2016 19:42 IST2016-05-04T19:42:31+5:302016-05-04T19:42:31+5:30

राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारींनी अखेर उद्योगपती विजय मल्ल्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Eventually, Mallya's resignation was accepted | अखेर मल्ल्यांचा राजीनामा स्वीकारला

अखेर मल्ल्यांचा राजीनामा स्वीकारला

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4- राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारींनी अखेर उद्योगपती विजय मल्ल्यांचा  राजीनामा स्वीकारला आहे. विजय मल्ल्यांनी हमीद अन्सारींकडे राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सोपवला होता. मात्र हमीद अन्सारी आणि शिस्तपालन समितीतं त्यावेळी तांत्रिक कारणास्तव राजीनामा फेटाळला होता. 
विजय मल्ल्यांची राजीनामावर स्वाक्षरी नसून, त्यांनी कोणतीही कागदपत्रं जोडली नसल्याचं कारण हमीद अन्सारींनी दिलं होतं. मात्र आज अखेर विजय मल्ल्यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहून राज्यसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. 
गेल्याच आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाकडून मल्ल्या यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यात आला. ईडीच्या आग्रहाखातर मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, तर मालमत्तेची पूर्ण माहिती बँकांना देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मल्ल्या यांना दिले आहेत.

Web Title: Eventually, Mallya's resignation was accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.