शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

तुमचा बापसुद्धा आर्टीकल 370 पुन्हा लागू करू शकत नाही, भाजपा नेता संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 15:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोदी सरकार 2 ने धडाकेबाज निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीरमधील आर्टीकल 370 हटवून केंद्र सरकारने काम दाखवून दिलं

ठळक मुद्दे'काश्मीरमध्ये पूर्वस्थिती प्रस्थापित करण्याच्या काश्मीरमधील राजकीय पक्षांच्या संकल्पनेचे मी स्वागत करतो. जम्मू आणि काश्मीर हे स्वतंत्र राज्य असावे, येथील हटविण्यात आलेले कलम 370 आणि आर्टीक 35 A पुन्हा लागू करणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री आणि पूर्वीश्रमीचे भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी काश्मिरी जनतेच्या पाठिशी असल्याचं सांगत आर्टीकल 370 पुन्हा लागू करण्याची आवशक्यता असल्याचं म्हटलंय. सर्वच राज्यांना त्यांचे अधिकार वापरता आले पाहिजे, असेही सिन्हा यांनी म्हटले आहे. सिन्हा यांच्या या ट्विटनंतर भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करुन सिन्हा यांच्यावर आगपाखड केली. तुमचा बापसुद्धा आता 370 पुन्हा लागू करू शकणार नाही, असे ट्वि मिश्रा यांनी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोदी सरकार 2 ने धडाकेबाज निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीरमधील आर्टीकल 370 हटवून केंद्र सरकारने काम दाखवून दिलं. मोदींच्या या निर्णयाचे देशभरातून कौतुक झाले, तर काहींनी टीकाही केली. पहिल्या पाच वर्षात मोदींनी नोटबंदी, जीएसटी आणि सर्जिकल स्ट्राईकसारखे धाडसी निर्णय घेऊन दुसऱ्यांदा सत्ता काबिज केली. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनाही मोदींच्या कार्याची, नेतृत्वाची भुरळ पडली आहे. आर्टीकल 370 हटवणे आणि नागरिकत्व संसोधन कायदा हे दोन धाडसी निर्णय मोदी सरकार2 ने घेतले आहेत. 

मोदी सरकारच्या या दोन्ही निर्णयाविरुद्ध काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाचं संकट असल्याने कोरोना आटोक्यात आणणे आणि देश पूर्ववत चालवणे हेच ध्येय सरकारचे आहे. त्यामुळे, इतर मुद्दे जास्त चर्चिले जात नाहीत. मात्र, यशवंत सिन्हा यांनी जम्मू व काश्मीरमधील नेत्यांच्या संकल्पनेचे स्वागत करत, आर्टीक 370 व कलम 35 अ पुन्हा लागू करण्याच गरज असल्याचे म्हटले.   'काश्मीरमध्ये पूर्वस्थिती प्रस्थापित करण्याच्या काश्मीरमधील राजकीय पक्षांच्या संकल्पनेचे मी स्वागत करतो. जम्मू आणि काश्मीर हे स्वतंत्र राज्य असावे, येथील हटविण्यात आलेले कलम 370 आणि आर्टीक 35 A पुन्हा लागू करणे आवश्यक आहे. कारण, सर्वच राज्यांना अधिकाधिक अधिकारांचा वापर करता आला पाहिजे, असे ट्विट सिन्हा यांनी केले आहे. सिन्हा यांच्या या ट्विटला भाजपा नेते आणि माजी आमदार कपिल मिश्रा यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुमचा बापसुद्ध 370 पुन्हा लागू करु शकणार नाह, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. तर, सिन्हा यांच्या ट्विटवनंतर कमेंट करुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केलीय.

टॅग्स :Article 370कलम 370BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरYashwant Sinhaयशवंत सिन्हाArticle 35 Aकलम 35-ए