शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'...त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 08:49 IST

पी चिदंबरम यांनी ट्विट करुन युएनमधील मोदींच्या भाषणावर भाष्य केलंय. त्यामध्ये, मोदींच्या भाषणाची एकप्रकारे खिल्लीच उडविण्याचं काम त्यांनी केलंय.

ठळक मुद्देपी चिदंबरम यांनी ट्विट करुन युएनमधील मोदींच्या भाषणावर भाष्य केलंय. त्यामध्ये, मोदींच्या भाषणाची एकप्रकारे खिल्लीच उडविण्याचं काम त्यांनी केलंय.

न्यूयॉर्क : अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद व घातपाती कारवायांसाठी  होणार नाही याची जगाने दक्षता घेतली पाहिजे. दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, हा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्या देशाला दिला. संयुक्त राष्ट्रांच्या ७६व्या आमसभेत शनिवारी केलेल्या भाषणात मोदी यांनी चीनवरही नाव न घेता टीका केली. मात्र, मोदींच्या भाषणावेळी सभागृहात गर्दी नसल्याने माजीमंत्री काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींना चिमटा काढलाय. 

पी चिदंबरम यांनी ट्विट करुन युएनमधील मोदींच्या भाषणावर भाष्य केलंय. त्यामध्ये, मोदींच्या भाषणाची एकप्रकारे खिल्लीच उडविण्याचं काम त्यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी युएनच्या सर्वसाधारण सभेत भाषण करत असताना सभागृहात फक्त काहीच सीट भरलेले होते. त्यामुळे, मी निराश झालो आहे, त्याहीपेक्षा निराश कुणीही टाळी न वाजवल्याने झालो, असे उपहासात्मक ट्विट पी चिदंबरम यांनी केलं आहे. युएनमधील भारताचे स्थायी सदस्यत्वाचे मिशन मोठ्या प्रमाणात वाढलंय, असेही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.  

मोदींचा नाव न घेता चीनवर निशाणा

मोदी म्हणाले की, आपले समुद्र हा आपला मोठा वारसा आहे. जागतिक व्यापारासाठी समुद्रमार्ग हे अतिशय महत्त्वाचे आहेत. विस्तारवादी भूमिका घेणाऱ्यांपासून जगाने स्वत:चे रक्षण केले पाहिजे. जागतिक कायदे, मूल्ये, नियमांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. दहशतवादाचा इतर देशांविरोधात वापर करणाऱ्यांनाही या गोष्टीपासून धोका आहे. योग्यवेळी योग्य काम पूर्ण नाही केले तर ते काम असफल होते, हे आर्य चाणक्य यांचे वचन उद्धृत करत मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कामात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. 

भारताने सर्वात आधी बनविली डीएनए लस 

भारताने जगात सर्वात आधी डीएनए लस विकसित केली. ही लस १२ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला दिली जाऊ शकते. कोरोनाशी मुकाबला करण्याकरिता भारत आरएनए पद्धतीची, तसेच नाकावाटे घेता येणारी लस तयार करण्यात गुंतला आहे. जगातील सर्व लस कंपन्यांनी भारतात उत्पादनांची निर्मिती इथे सुरू करावी, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAmericaअमेरिकाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघP. Chidambaramपी. चिदंबरम