जम्मू-काश्मिरातही ‘इंडिया’ भक्कम; नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आले सोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:07 AM2024-02-27T10:07:27+5:302024-02-27T10:07:43+5:30

बारामुल्ला, श्रीनगर आणि अनंतनाग या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सकडे आहेत. भाजपकडे लडाख आणि जम्मूच्या लोकसभेच्या दोन जागा उधमपूर आणि जम्मू या आहेत.

Even in Jammu and Kashmir, 'India' is strong; Along with the National Conference, PDP came | जम्मू-काश्मिरातही ‘इंडिया’ भक्कम; नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आले सोबत

जम्मू-काश्मिरातही ‘इंडिया’ भक्कम; नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आले सोबत

- आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सपा आणि आपनंतर आता जम्मू-काश्मीरमध्येहीइंडिया आघाडीचे पक्ष एकत्र येत आहेत. येथील सहा जागांचे तीन पक्षांमध्ये वाटप झाले आहे. त्याची घोषणा या आठवड्यात होणार आहे. 

बारामुल्ला, श्रीनगर आणि अनंतनाग या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सकडे आहेत. भाजपकडे लडाख आणि जम्मूच्या लोकसभेच्या दोन जागा उधमपूर आणि जम्मू या आहेत. या जागावाटपानुसार, नॅशनल कॉन्फरन्स तीन, काँग्रेस दोन आणि पीडीपी एक जागा लढविणार आहे. 

एक फोन अन् 
झाली आघाडी
nनॅशनल कॉन्फरन्सने काश्मीर खोऱ्यातील एक जागा पीडीपीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
nयापूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी अशी घोषणा केली होती की, नॅशनल कॉन्फरन्स कोणाशीही आघाडी करणार नाही. 
nते स्वबळावर निवडणूक लढतील पण राहुल गांधी यांनी फोन केल्यानंतर दोन्ही पक्षांसोबत आघाडी झाली आहे.
nराहुल गांधी यांनी ओमर अब्दुल्ला यांना फोन करून आघाडीसाठी राजी केले.

सत्तेत आल्यास ‘अग्निपथ’ रद्द करणार
“अग्निपथ” योजनेबद्दल बोलताना काँग्रेसने केंद्रात सत्तेवर आल्यास अग्निपथ योजना रद्द करून जुनी भरती पद्धत राबवली जाईल, असे सांगितले. २०२२ मध्ये “अग्निपथ” योजना सुरू केल्यानंतर भरती प्रक्रिया पार पडली, परंतु २ लाख तरुणांना नियुक्तीपत्रे न दिल्याचा आरोप काँग्रेसने केला.

अग्निपथ योजनेमुळे सुमारे दोन लाख तरुण-तरुणींचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. देशभक्ती आणि शौर्याने प्रेरित असलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस तरुणांसोबत आहे. तरुणांनी त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यात अनेक वर्षे घालवली आणि हाती निराशा आल्याने अनेकांनी आत्महत्या केली.
- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस 

Web Title: Even in Jammu and Kashmir, 'India' is strong; Along with the National Conference, PDP came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.