शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर आहे प्रचंड नाराजी, माेदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचाच गाैप्यस्फाेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 06:47 IST

BJP Politics News: गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या बातम्या चर्चेत हाेत्या, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये सारे काही आलबेल आहे, असे नाही. भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर प्रचंड नाराजी असून, माेदी सरकारच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानेच ही बाब उघड केली आहे.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या बातम्या चर्चेत हाेत्या, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये सारे काही आलबेल आहे, असे नाही. भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर प्रचंड नाराजी असून, माेदी सरकारच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानेच ही बाब उघड केली आहे. हिंमत असेल, तर माेदींनी आपली मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून दाखविण्याची धमकी दिल्याचा दावाही मंत्र्याने केला आहे. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातही मतभेद असल्याचा दावा या मंत्र्याने केला  आहे.

माेदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदावर असलेल्या या मंत्र्याने अनाैपचारिक चर्चेत ‘लाेकमत’कडे अनेक गाेष्टींचा गाैप्यस्फाेट केला. त्यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी काही याेजनांबाबत भूमिका मांडली हाेती. ती फेटाळताना माेदींनी दुखावणारे वक्तव्य केले हाेते. त्यावेळी हिम्मत असेल, तर मला मंत्रिमंडळातून काढून दाखवा, अशी मी माेदींना थेट धमकी दिली हाेती. माझ्यासाेबत २५२ खासदार असून, काेणत्याही क्षणी माेदी सरकार पाडण्याचे सामर्थ असल्याचा दावाही या मंत्र्याने केला आहे. माेदी आणि अमित शहांमध्येही सारे काही ठीक नसल्याचे संकेतही त्यांनी या चर्चेतून दिले.माेदी आत्मप्रेमात मग्न आहेत. संसदेत आपल्या भाषणावर काेणी किती टाळ्या वाजविल्या, हे माेदी स्वत:च्या चेंबरमध्ये बसून माेजत असल्याचेही या मंत्र्याने सांगितले. 

राजनाथ पुत्राचे मंत्रिपद माेदींनी राेखलेसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज यांना याेगी सरकारमध्ये मंत्रिपद देण्यापासून माेदींनी राेखले हाेते, असा खळबळजनक गाैप्यस्फाेटही या मंत्र्याने केला आहे. राजनाथ सिंह हे आतापर्यंत माेदींशी वाद घालत हाेते. मात्र, त्यांनीही आता शस्त्रे म्यान केली आहेत, असे या मंत्र्याने सांगितले.

तपाससंस्थांचा विराेधकांविराेधात वापरसीबीआय, ईडी, आयटी यांसारख्या संस्थांचा माेदी विराेधकांविराेधात वापर करत असल्याची टीकाही या मंत्र्याने केली आहे. माेदींच्या या धाेरणाचा मी विराेध केला हाेता. मात्र, मुख्यमंत्री ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास याच धाेरणाचा वापर करून पार केल्याचे माेदींनी त्यावेळी उत्तर दिले हाेते. 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहPoliticsराजकारण