शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातही घरी साजरी होतेय 'दिवाळी', भुपेंद्र पटेलांच्या कुटुंबीयांना अत्यानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 15:45 IST

विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देआमच्यासाठी हा अनपेक्षित असा आश्चयार्चा धक्का आहे. आम्ही कधीही कल्पनासुद्धा केली नव्हती की, थेट मुख्यमंत्रीपद आमच्या घरात येईल. आता, आम्हाला भुपेंद्र यांचं नीटनेटकं स्वागत करण्यासही वेळ नाही

अहमदाबाद - पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. पटेल आज, सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे, गणेशोत्सवातही पटेल यांच्याघरी दिवाळीचे वातावरण आहे. पटेल यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याने पटेल यांच्या कुटुंबीयांना अत्यानंद झाला असून सेलिब्रेशनही सुरू आहे. 

विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. भूपेंद्र पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. पटेल यांच्या निवडीच्या घोषणेनंतर त्यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी नातेवाईक, शेजारी आणि मित्र परीवाराने गर्दी केली होती. तसेच, या निवडीचे सेलिब्रेशनही करण्यात आले. आमच्यासाठी ही अनपेक्षित सरप्राईज आहे. त्यामुळेच, घरी दिवाळीसारखं वातावरण बनलंय, असे भूपेंद्र यांच्या पत्नी हेतल पटेल यांनी म्हटलं आहे. 

आमच्यासाठी हा अनपेक्षित असा आश्चयार्चा धक्का आहे. आम्ही कधीही कल्पनासुद्धा केली नव्हती की, थेट मुख्यमंत्रीपद आमच्या घरात येईल. आता, आम्हाला भुपेंद्र यांचं नीटनेटकं स्वागत करण्यासही वेळ नाही. मात्र, दिवाळीसारखं वातावरण आमच्या कुटुंबात निर्माण झालंय, असे हेतल पटेल यांनी म्हटलं. तर, मोदींनी आम्हाला हे सरप्राईज दिलं, त्याबद्दल भूपेंद्र यांचे लहान भाऊ केतन पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.  

भूपेंद्र पटेल हे गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आज दुपारी शपथ घेणार आहेत. पुढच्या वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विजय मिळणे शक्य नाही, असा निष्कर्ष पक्षाच्या सर्वेक्षणातून समोर आला होता. पक्षात रुपानी यांच्याविषयी नाराजी होती. ते राज्यातील कोरोना स्थिती नीटपणे हाताळण्यात अयशस्वी ठरल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास श्रेष्ठींनी सांगितले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव विजय रुपानी यांनीच मांडला व तो एकमताने संमत झाला.

भाजपचे धक्कातंत्र कायम 

- गुजरातचे भावी मुख्यमंत्री म्हणून मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांसह काही जणांची नावे शर्यतीत होती. भूपेंद्र पटेल यांचे नाव अजिबात चर्चेत नव्हते. अशाच नावाची निवड करून भाजपचे आपले धक्कातंत्र कायम ठेवले आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातChief Ministerमुख्यमंत्रीNarendra Modiनरेंद्र मोदीBhupendra Patelभूपेंद्र पटेल