अविश्वासानंतरही बीडीओ रूजू पदाधिकार्यांची प्रशासनावर नाराजी : विभागीय आयुक्तांना भेटणार
By Admin | Updated: February 23, 2016 00:03 IST2016-02-23T00:03:55+5:302016-02-23T00:03:55+5:30
जळगाव- गटविकास अधिकारी (बीडीओ) डॉ.सोनिया नाकाडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सर्वानुमते पं.स.च्या पदाधिकारी व सदस्यांनी आणला. तरीदेखील नाकाडे दीर्घकालीन सुीनंतर सोमवारी रूजू झाल्या. जि.प. प्रशासनाने सदस्यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले. अपमान केला म्हणून आता विभागीय आयुक्त यांना या प्रकाराची माहिती दिली जाईल, असे पं.स.च्या सभापती हिराबाई मोरे, उपसभापती सिमा पाटील, सदस्य विजय नारखेडे व इतरांनी म्हटले आहे.

अविश्वासानंतरही बीडीओ रूजू पदाधिकार्यांची प्रशासनावर नाराजी : विभागीय आयुक्तांना भेटणार
ज गाव- गटविकास अधिकारी (बीडीओ) डॉ.सोनिया नाकाडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सर्वानुमते पं.स.च्या पदाधिकारी व सदस्यांनी आणला. तरीदेखील नाकाडे दीर्घकालीन सुीनंतर सोमवारी रूजू झाल्या. जि.प. प्रशासनाने सदस्यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले. अपमान केला म्हणून आता विभागीय आयुक्त यांना या प्रकाराची माहिती दिली जाईल, असे पं.स.च्या सभापती हिराबाई मोरे, उपसभापती सिमा पाटील, सदस्य विजय नारखेडे व इतरांनी म्हटले आहे. बीडीओ नाकाडे या मनरेगा व इतर कामांच्या संदर्भात सदस्यांना विश्वासात घेत नाहीत म्हणून सदस्यांनी बीडीओंवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्याची प्रत जि.प.ला टपालाद्वारे दिली. प्रत सोमवारी जि.प.त अविश्वास प्रस्ताव व बीडीओंच्या तक्रारींबाबतची प्रत सोमवारी दुपारी जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाला मिळाली, असा खुलासा या विभागाने केला. बीडीओंना मुदतवाढबीडीओ नाकाडे या प्रशिक्षणार्थी म्हणून पं.स.मध्ये जून २०१५ मध्ये रूजू झाल्या. त्यांचा कार्यकाळ १२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत होता. आता पुढील आदेश येईपर्यंत बीडीओंना या पदावर कायम ठेवावे, असे आदेश शासनातर्फे अलीकडेच जि.प.ला प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातर्फे मिळाली. कार्यमुक्त करणे अशक्यबीडीओंविरोधात सदस्य अविश्वास प्रस्ताव आणू शकतात की नाही याचा निकष किंवा नियम नसला तरी असा प्रस्ताव आणला तरी त्याची दखल शासन घेत नाही. यामुळे बीडीओ नाकाडे यांना अविश्वासाच्या कारणामुळे कार्यमुक्त करणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण सामान्य प्रशासन विभागाने दिले आहे.