शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

आंदोलनाच्या तीन दशकांनंतरही ‘त्या’ भाजपसाठी खलनायिकाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:50 IST

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात सतत होताहेत लक्ष्य

बडोदा : गुजरातमधील सर्वात मोठ्या सरदार सरोवर या सिंचन प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला तीन दशकांहून अधिक काळ लोटला, प्रकल्प पूर्ण झाला, लाखो लोकांना पाणीही मिळाले; पण त्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना आजही भाजपकडून खलनायिका म्हणूनच रंगविले जात असल्याचा प्रत्यय निवडणूक प्रचारात जागोजागी येतो.

गुजरातची दुश्मन’ असे मेधाताईंना ठिकठिकाणच्या सभेत भाजपचे नेते संबोधत असतात. गुजरातला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प असून, त्याला विरोध करणाऱ्या पाटकर या गुजरातच्या शत्रू असल्याचे चित्र आजही भाजपकडून उभे केले जाते. मेधाताईंनी आंदोलनातील हजारो आदिवासींच्या पुनर्वसनाचा लढा यशस्वी केला. अनेकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं; पण गुजरातमधील भाजप सरकार आणि नेत्यांनी त्यांना नेहमीच दुश्मन म्हणून हिणवले. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा मेधाताई त्या यात्रेत काही वेळ चालल्या होत्या. त्यावरून गुजरातमधील नेतेच नव्हे तर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेधाताईंबरोबरच राहुल गांधी व काँग्रेसवर निशाणा साधताना दिसतात. सरदार सरोवर प्रकल्पाला एक-दोन नव्हे तर तब्बल तीस वर्षे विरोध करणाऱ्या महिलेसोबत काँग्रेसचे नेते फिरत आहेत. हेच काँग्रेसवाले तुम्हाला मते मागायला येतील तेव्हा त्यांना या गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय राहू नका, असा हल्ला मोदी हे राहुल गांधी वा मेधाताईंचे नाव न घेता चढवत आहेत.  

पाटकर या आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असतील, अशी चर्चा तीन महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये होती. काही सामाजिक कार्यकर्ते हे त्यांना मागच्या दरवाजाने गुजरातच्या राजकारणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. पाटकर यांनी २०१४ मध्ये आपतर्फे मुंबईत लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, गुजरातच्या राजकारणात उतरणार असल्याचा स्पष्ट इन्कार पाटकर यांनी त्यावेळी केला होता.

मला गुजरातचे दुश्मन म्हणता, गुजरातचे खरे दुश्मन तर भाजप आाणि येथील सरकार आहे. मुळात ३० वर्षे मी प्रकल्प अडविला, हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या सरकारने विरोध केला होता; आम्ही तर प्रकल्पग्रस्तांचे हक्क मागत राहिलो. सरदार सरोवरातून शेतकऱ्यांना पाणी देण्याचा शब्द भाजपच्या सरकारला आजही पाळता आलेला नाही. अदानींसारख्या उद्योगपतींना ते दिले गेले. ते अपयश झाकण्यासाठी मला लक्ष्य केले जाते.    - मेधा पाटकर, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या.

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Medha Patkarमेधा पाटकर