शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

वाह रे वीर जवाना; पाकिस्तानी सैन्यानं मारलं-छळलं, तरीही अभिनंदन यांनी गुप्ततेचं वचन पाळलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 21:12 IST

अमानुष मारहाण सहन केली, पण कोणतीही गोपनीय माहिती दिली नाही

नवी दिल्ली: भारताचे दोन वैमानिक ताब्यात असल्याचा दावा पाकिस्ताननं दुपारच्या सुमारास केला होता. यानंतर आता पाकिस्ताननं केवळ एकच वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचं म्हटलं आहे. अभिनंदन वर्धमान असं पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या वैमानिकाचं नाव आहे. ते हवाई दलात विंग कमांडर आहेत. आज सकाळी मिग 21 विमानातून त्यांनी उड्डाण केलं. मात्र त्यांचं विमान कोसळलं आणि पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं. भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या हाती लागल्याचं वृत्त पसरताच देशभरातून चिंता व्यक्त होऊ लागली. थोड्याच वेळात ताब्यात असलेल्या वैमानिकाचं नाव अभिनंदन असल्याची माहिती समोर येऊ लागली. त्यानंतर त्यांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. यामध्ये पाकिस्तानकडून अभिनंदन यांना अमानुषपणे मारहाण होत असल्याचं दिसत होतं. यानंतर भारतानं पाकिस्तानकडे अभिनंदन यांच्या सुटकेची मागणी केली. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. सीमावर्ती भागात दोन्ही देशांच्या कारवाई सुरू आहेत. त्यामुळे अभिनंदन यांना ताब्यात घेताच पाकिस्ताननं त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्याकडून भारताच्या पुढील योजना, रणनिती याबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र मारहाण होऊनही अभिनंदन यांनी कोणतीही गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली नाही. 'माझं नाव विंग कमांडर अभिनंदन आहे. माझा सर्व्हिस नंबर 27981 आहे. मी फ्लाईंग पायलट असून हिंदू आहे,' इतकीच जुजबी माहिती त्यांनी दिली. या व्हिडीओत अभिनंदन यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे.अभिनंदन यांच्या मारहाणीचा व्हिडीओ समोर येताच भारतानं पाकिस्तानला संपर्क केला आणि त्यांच्या सुखरुप सुटकेची मागणी केली. युद्धकैदीला मारहाण करुन पाकिस्तान जिनिव्हा कराराचा भंग करत असल्याचा आरोप भारतानं केला. यानंतर पाकिस्ताननं अभिनंदन यांचा नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये अभिनंदन चहा पित असताना दिसत आहेत. 'माझ्यासोबत काहीच चुकीचं घडत नाही आणि भारतात आल्यावरही मी याच विधानावर कायम असेन,' असं या व्हिडीओमध्ये अभिनंदन यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानpilotवैमानिक