शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

१४० वर्षे उलटली तरी कावेरीचे पाणी तापलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 06:32 IST

बस रोखल्या; शाळा - महाविद्यालये बंद

बंगळुरू : कावेरी नदीचे पाणीतामिळनाडूला सोडण्यावरून कर्नाटकातील शेतकऱ्यांनी मंगळवारी राजधानी बंगळुरूमध्ये १२ तासांच्या बंदची हाक दिली. शाळा, महाविद्यालये उघडली नाहीत. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होते. आंदोलकांनी तामिळनाडूहून येणाऱ्या बसगाड्याही रोखल्या.१३ सप्टेंबर रोजी कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीडब्ल्यूएमए) एक आदेश जारी करून कर्नाटकने कावेरी नदीतून पुढील १५ दिवस तामिळनाडूला ५ हजार क्युसेक पाणी देण्याचे आदेश दिले होते. कर्नाटकातील शेतकरी संघटना, कन्नड संघटना आणि विरोधी पक्ष या निर्णयाला विरोध करत आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमधील कावेरी नदीशी संबंधित हा वाद १४० वर्षे जुना आहे.

विरोधक राजकारण करत आहेत : मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधी पक्ष भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) कावेरी पाणी वादावर राजकारण करत असल्याचा आरोप म्हैसूरमध्ये पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, तामिळनाडूच्या लोकांनी १२,५०० क्युसेक पाणी मागितले आहे. परंतु, सध्या आम्ही ५,००० क्युसेक पाणी सोडण्याच्या स्थितीत नाही.

बंगळुरूत जमावबंदीबंद दरम्यान तामिळनाडू - कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी बंगळुरूमध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू केली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकTamilnaduतामिळनाडूWaterपाणी